वाहतूक कोंडीची रावेतकरांना डोकेदुखी, चौैकातील अतिक्रमणे ठरताहेत कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:23 AM2017-11-24T01:23:11+5:302017-11-24T01:23:23+5:30

रावेत बीआरटीएस मार्गावरील संत तुकाराममहाराज पुलालगत असणाºया मुख्य चौकातील सिग्नल असून अडचण नसून खोळंबा अशा अवस्थेत आहे.

Traffic clauses cause headaches and encroachments in the four-wheeler | वाहतूक कोंडीची रावेतकरांना डोकेदुखी, चौैकातील अतिक्रमणे ठरताहेत कारणीभूत

वाहतूक कोंडीची रावेतकरांना डोकेदुखी, चौैकातील अतिक्रमणे ठरताहेत कारणीभूत

googlenewsNext

रावेत : रावेत बीआरटीएस मार्गावरील संत तुकाराममहाराज पुलालगत असणाºया मुख्य चौकातील सिग्नल असून अडचण नसून खोळंबा अशा अवस्थेत आहे. या चौकातील रस्ते मोठे असले, तरी वाहनचालकांची बेशिस्त व चौकातील अतिक्रमण वाढल्याने या चौकातील वाहतूककोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. या चौकात सिग्नल सुरू झाल्याने रस्त्याच्या चारही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. येथे वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच झाला असून, बुधवारी रात्री आठला सर्वच बाजूंनी प्रचंड वाहतूककोंडी झाली होती.
सायंकाळच्या वेळी या चौकालगत असणाºया संत तुकाराममहाराज पुलावर, पुनावळे येथील सावता माळी चौकापर्यंत, बीआरटीएस मार्ग, वस्ती रस्ता, वाल्हेकरवाडी मार्ग, भोंडवे कॉर्नर ते आंबेडकर चौक अशा चहुबाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक महिन्यांनी नागरिकांना या चौकात वाहतूक विभागाचा एक कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना दिसून आला. परंतु वाहतूक काही केल्या सुरळीत होत नव्हती. तेव्हा रावेत येथील अनेक सामाजिक कार्यकर्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदतीला धावून गेले. जवळपास दोन ते अडीच तासांनी येथील वाहतूक सुरळीत झाली. नेहमीच मुख्य चौकात सायंकाळच्या वेळी वाहतुकीचे तीन तेरा पहावयास मिळतात. त्यामुळे रावेतकर आणि प्रवासी हैराण आहेत. व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण आणि रिक्षाचालकांनी भरचौकात रिक्षाथांबा केल्याने येथे रहदारीस अडथळा निर्माण होतो. प्रशासन मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे. चौकातील असणारी गोलाई आवश्यकतेपेक्षा अधिक मोठी असल्याने या मुख्य चौकातील जागा अधिक प्रमाणात व्यापून टाकल्याने चौक लहान झाला आहे. येथून महामार्ग जवळ असल्याने डांगे चौक, वाल्हेकरवाडी, आकुर्डी आदी ठिकाणाहून दररोज शेकडो अवजड व लहान वाहने मार्गस्थ होत असतात. प्रत्येक जण वाहतूक कोंडीतून रस्ता शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. वाहतूक नियंत्रक दिवे कधी सुरू, तर कधी बंद असतात. दिवे सुरू असले, तरी तेथे वाहतूक कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे वाहनचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने दामटत असतात.
>सिग्नल : असून अडचण, नसून खोळंबा
बेभरवशाची वाहतूक यंत्रणा, अधूनमधून बिघाड होत असलेली सिग्नल यंत्रणा, चौकातील वाहतुकीचा अंदाज न घेता लावलेली वाहतूक नियंत्रण दिव्यांची वेळ, तर गायब असलेले पोलीस कर्मचारी यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याऐवजी कोंडीच अधिक होत असल्याची स्थिती आहे. यामुळे चौकातील सिग्नल यंत्रणेची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. यातच अगदी सिग्नल तोडूनही आपलेच वाहन पुढे काढण्याच्या वाहनचालकांच्या प्रतापाने सिग्नल असलेल्या चौकातही वाहतुकीचा बोजवारा उडताना दिसत आहे. बीआरटीएस मार्गावरून धावणाºया पीएमपी बससाठी या चौकात स्वतंत्र रस्ता नसल्यामुळे चालक बिनधास्तपणे बस गर्दीत घुसवतात. येथे वाहतूक पोलीस नसल्याने सर्रास सिग्नल तोडले जातात.
सिग्नल असूनही वाहतूककोंडी होत असल्याची स्थिती आहे. या ठिकाणी वाहतूक कर्मचारी दिसत नसल्याने वाहनधारक सिग्नल कुठलाही लागलेला असो, मध्येच वाहन घुसवून वाहतूककोंडी व अपघाताला निमंत्रण देत असल्याची स्थिती असते. या सिग्नलच्या बाजूच्या मार्गाने बायपास काढून वाहनचालक न थांबता निघून जात असतात. यामुळे दुसºया बाजूने येणाºया वाहनांना अडथळा निर्माण होतो.
अनेकदा सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन कोणतेही आकडे व कोणताही दिवा अचानक सुरू झाल्याने वाहनचालकांचीच भंबेरी उडत असल्याचे प्रकार घडत आहेत. सकाळी कार्यालयीन वेळ गाठण्यासाठी आणि सायंकाळी घर गाठण्यासाठी वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. पादचारी व्यक्तींना रहदारीत रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग उपयोगी ठरतो. मात्र सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंग गायब झाले आहेत.

Web Title: Traffic clauses cause headaches and encroachments in the four-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.