हजारो एटीएम कार्ड नववर्षात झाले ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:41 AM2019-01-08T00:41:55+5:302019-01-08T00:42:53+5:30

ग्राहकांना नाहक त्रास : मायक्रोचिप असलेले कार्ड वापरण्याचा निर्णय

Thousands of ATM cards have been rebuilt in the block | हजारो एटीएम कार्ड नववर्षात झाले ब्लॉक

हजारो एटीएम कार्ड नववर्षात झाले ब्लॉक

Next

रहाटणी : रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार जुने तंत्रज्ञान असलेले मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड ३१ डिसेंबर २०१८ रोजी हजारो ग्राहकांचे जुने एटीएम कार्ड ब्लॉक करण्यात आले. या ग्राहकांना नवीन कार्ड उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र अनेकांचे एटीएम कार्ड बँकेमध्ये आलेच नाहीत. त्यामुळे संबंधित बँकेच्या एटीएमधारक ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बँकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी मागेल त्याला एटीएम कार्ड देण्याचे धोरण आहे. यापूर्वीच्या या कार्डला मॅग्नेटिक स्ट्रिप एटीएम कार्ड म्हटले जात होते. यामध्ये जुने तंत्रज्ञान असल्याने या एटीएम कार्डमुळे अनेकांना फसवणुकीच्या घटनेला सामोरे जावे लागले. यावर आळा घालण्यासाठी मायक्रोचीप असलेले युरोपियन मास्टरकार्ड वापरण्याचा निर्णय घेतला. जुने सर्व एटीएम कार्ड ३१ डिसेंबर २०१८ नंतर बंद होतील, अशा सूचना सर्व बँकांना दिल्या होत्या. बँकांनीही संबंधित ग्राहकांना याबाबतची सूचना संदेशाच्या माध्यमातून दिली होती. मात्र जुने एटीएम कार्ड सुरू असेपर्यंत ग्राहकांनी नवीन कार्ड बदलून घेतले नाहीत. ३१ डिसेंबरनंतर जुने कार्ड बंद झाल्यानंतर ग्राहकांची अडचण सुरू झाली. अनेकांना तर एटीएम कार्ड का काम करत नाही, हेसुद्धा माहीत नव्हते. बँकेत जाऊन विचारणा केल्यानंतर अनेकांना नेमके कारण कळले. या शहरातील लाखो ग्राहकांना या प्रकारामुळे मोठा त्रास सहन करावा लागला आहे. अनेक बँका लगेच कार्ड देत आहेत. काही बँका कार्डसाठीचा अर्ज भरून घेऊन जुने एटीएम कार्ड जमा करून ते संबंधित बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवीत असल्याने एटीएम कार्ड येण्यास दोन आठवड्यांचा कालावधी लागत आहे. या काळात नेमके बँकेचे व्यवहार कसे करावे, असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

पिन बदलताना गोंधळ
अनेक बँकेच्या एटीएम कार्ड विभागाकडून पहिल्या टप्प्यात काही ग्राहकांचे नवीन एटीएम कार्ड संबंधित बँकेकडे सुपूर्द करण्यात आले. मात्र दुसऱ्या व तिसºया टप्प्यातील कार्ड ग्राहकांच्या घरच्या पत्त्यावर पाठवले जात आहेत. दरम्यान ज्या ग्राहकांना नवीन डेबिट कार्ड मिळाले त्यांना एटीएम सेंटरवर जाऊन स्वत: त्याचा पासवर्ड अर्थात पिन क्रमांक बदलावा लागत आहे. या प्रक्रियेमुळे गोंधळ उडत आहे.
बँकेकडूनच होतोय विलंब
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबर २०१८ च्या मध्यरात्रीपासून जुने एटीएम कार्ड बंद पडले व इनबिल्ट चिप असलेले एटीएम कार्ड सुरू करण्यात आलेले आहेत. चीप असलेले एटीएम कार्ड काही बँका लगेच बदलून देत आहेत. मात्र दिलेले कार्ड कार्यान्वित करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी घेत आहेत.

जुने सर्व एटीएम कार्ड ३१ डिसेंबर २०१८ नंतर बंद होतील, अशा सूचना सर्व बँकांना दिल्या होत्या. बँकांनीही संबंधित ग्राहकांना याबाबतची सूचना संदेशाच्या माध्यमातून दिली
होती. मात्र जुने एटीएम कार्ड सुरू असेपर्यंत ग्राहकांनी नवीन कार्ड बदलून घेतले नाहीत. ३१ डिसेंबरनंतर जुने कार्ड बंद झाल्यानंतर ग्राहकांची अडचण सुरू झाली.
 

Web Title: Thousands of ATM cards have been rebuilt in the block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.