पिंपरीसाठी पीएमपीचे दहा नवीन मार्ग , प्रशासनाचा निर्णय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 04:46 AM2018-01-01T04:46:48+5:302018-01-01T04:46:53+5:30

नववर्षानिमित्त पीएमपी प्रशासनातर्फे पुण्यातील प्रवाशांना अधिक प्रवासीकेंद्रित व सुरक्षित बससेवा उपलब्ध देण्यात येणार आहे. पीएमपीकडून जानेवारी महिन्यापासून नवीन १२ मार्गांवर बससेवा सुरू केली जाणार आहे.

 Ten new ways of PMP for Pimpri, administration decision | पिंपरीसाठी पीएमपीचे दहा नवीन मार्ग , प्रशासनाचा निर्णय  

पिंपरीसाठी पीएमपीचे दहा नवीन मार्ग , प्रशासनाचा निर्णय  

Next

पिंपरी : नववर्षानिमित्त पीएमपी प्रशासनातर्फे पुण्यातील प्रवाशांना अधिक प्रवासीकेंद्रित व सुरक्षित बससेवा उपलब्ध देण्यात येणार आहे. पीएमपीकडून जानेवारी महिन्यापासून नवीन १२ मार्गांवर बससेवा सुरू केली जाणार आहे. त्यात पिंपरीतील दहा मार्गांचा समावेश आहे. तसेच सध्या दररोज होणाºया बसच्या खेपांमध्ये ३ हजार खेपांनी वाढ होणार असल्याने प्रतिदिनी बस खेपांची संख्या २४ हजार ३०० पर्यंत वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बससेवेचा अधिक चांगल्या प्रकारे लाभ घेता येईल, असा विश्वास पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
पीएमपी प्रशासनातर्फे प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या आठ महिन्यांत प्रवासीसंख्या, मार्गांचे परीक्षण लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य प्रवाशांच्या मागणीनुसार नवीन वर्षानिमित्त अधिक तत्पर सेवा देण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे नमूद करून मुंढे म्हणाले, की पीएमपीच्या पूर्वीच्या १ हजार ४३६ शेड्यूलमध्ये आता ३७४ शेड्यूलने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या शेड्यूलची संख्या १ हजार ८१० झाली आहे. या शेड्यूलच्या माध्यमातून पीएमपी बसच्या दररोज २४ हजार ३०० फेºया होणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून १ हजार ६२० शेड्यूल प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे, तर उर्वरित शेड्यूल जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू करण्यात येतील, असेही तुकाराम मुंढे म्हणाले.
नवीन वर्षानिमित्त महिलांसाठी ३० विशेष बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे नमूद करून मुंढे म्हणाले, ‘‘जास्तीत जास्त बस मार्गावर देऊन प्रवाशांना वेळेत बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी ७६ अतिरिक्त शेड्यूलचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गर्दीच्या वेळी सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४.३० पासून रात्री ८.३० पर्यंत जादा बस सोडल्या जाणार आहेत. ज्या भागात अद्याप एकही बस गेलेली नाही, अशी गावे
नव्या शेड्यूलमध्ये घेण्यात आली आहेत.

गर्दीच्या वेळी जादा फेºया
पीएमपीच्या बसला सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणवर गर्दी असते. या गर्दीच्या वेळेत नोकरदार, कामगार, विद्यार्थी यांना वेळेवर आणि चांगली प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकाळी ८ ते १२ आणि संध्याकाळी ४.३० ते ८.३० या वेळेत ७५ शेड्यूलच्या माध्यमातून बसच्या ६३६ जादा फेºया मारल्या जाणार आहेत. त्यात सकाळच्या सत्रात ३४०, तर सायंकाळच्या सत्रात २९६ फेºया मारल्या जाणार आहेत.

मिडीबस लवकरच दाखल होणार

पीएमपीच्या ताफ्यात पुढील काही दिवसांत २०० मिडीबस दाखल होणार आहेत. नवीन वर्षाच्या नियोजनामध्ये मिडीबसचे १०० शेड्यूल तयार करण्यात आले आहे. मिडीबस दाखल झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत या मार्गांवर बस चालविल्या जातील.
जानेवारी महिन्यात सुरू केल्या जाणाºया १२ मार्गांपैकी ८ नवीन मार्ग याप्रमाणे :
४स्वारगेट - वाघोली (पूलगेट, मगरपट्टा सिटी, खराडी बायपासमार्गे)
४हडपसर - वाघोली (थेऊर, साष्टे,
केसनंदमार्गे)
४स्वारगेट - उंड्रीगाव (देसाई हॉस्पिटल, महंमदवाडीमार्गे)
४वारजे माळवाडी - केशवनगर (मुंढवा, मनपा, घोरपडीमार्गे)
४कात्रज - सासवड (कोंढवा हॉस्पिटल, बोपदेवघाट, भिवरीमार्गे)
४वडगाव मावळ - चाकण (तळेगाव स्टेशन, म्हाळुंगेमार्गे)
४भोसरी - वाघोली (विश्रांतवाडी, धानोरी, लोहगावमार्गे)
४घोटवडे फाटा - पिंपरी रोड (कस्पटेवस्ती, हिंजवणी, शेळकेवाडी फाटामार्गे)

पीएमपीतर्फे पुढील
नवीन १२ मार्ग सुरू करणार

भोसरी - वाघोली (विश्रांतवाडी,
लोहगावमार्गे)
भोसरी - पाबळ फाटा ( चाकण,
शिक्रापूरमार्गे)
वडगाव मावळ -चाकण (तळेगाव स्टेशन, इंदोरी, म्हाळुंगेमार्गे)
मुकाई चौक - हिंजवडी (रावेत,
पुनावळे, डांगे चौकमार्गे),
वडगाव मावळ -हिंजवडी (सोमाटणे, विकासनगर, भूमकर चौकमार्गे)
कात्रज - सासवड (बोपदेव घाटमार्गे )
वारजे माळवाडी- केशवनगर मुंढवा (कोरेगाव पार्कमार्गे)
चिंचवड गाव - कोथरुड स्टॅण्ड (डेक्कन, औंध, डांगे चौकमार्गे)
स्वारगेट- उंड्री (महंमदवाडी, देसाई हॉस्पिटल, हडपसर, मंडईमार्गे)
हडपसर - वाघोली (थेऊर, कोलवडी, साष्टेमार्गे)
स्वारगेट - वाघोली (मगरपट्टा सिटी)
घोटवडे फाटा - पिंपरी रोड (शेळकेवाडी फाटा, माण, हिंजवडीगाव)

Web Title:  Ten new ways of PMP for Pimpri, administration decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.