द्रुतगतीवर टेम्पो अपघातात एक जण ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:02 PM2018-05-22T13:02:22+5:302018-05-22T13:02:22+5:30

अमृतांजन पुलाजवळील उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकला.

tempo accident one person death | द्रुतगतीवर टेम्पो अपघातात एक जण ठार 

द्रुतगतीवर टेम्पो अपघातात एक जण ठार 

googlenewsNext

लोणावळा : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पो चालकाचे अमृतांजन पुलाजवळील उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकला. त्यामुळे झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यु झाला. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातातील मयत चालकाचे नाव व पत्ता अद्याप समजू शकलेले नाही. खंडाळा महामार्ग पोलीस याप्रकरणी तपास करत आहे. 

Web Title: tempo accident one person death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.