रिंगरोडबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा, पुढील आठवड्यात चर्चेतून मार्ग निघण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:56 AM2017-09-22T00:56:39+5:302017-09-22T00:56:42+5:30

एक महिन्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील रिंगरोडच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करण्यास सर्वपक्षिय समितीच्या शिष्टमंडळाला वेळ दिला आहे. लवकरच ही बैठक होणार आहे.

Talk about the ring road soon with the chief ministers, the possibility of a road exit from next week | रिंगरोडबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा, पुढील आठवड्यात चर्चेतून मार्ग निघण्याची शक्यता

रिंगरोडबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा, पुढील आठवड्यात चर्चेतून मार्ग निघण्याची शक्यता

Next

रावेत : एक महिन्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील रिंगरोडच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करण्यास सर्वपक्षिय समितीच्या शिष्टमंडळाला वेळ दिला आहे. लवकरच ही बैठक होणार आहे.
चिंचवड, वाल्हेकरवाडी, थेरगाव, पिंपळे गुरव या दाट लोकवस्ती परिसरातून जाणाºया प्रस्तावित रिंगरोडमुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. आपली हक्काची घरे वाचविण्यासाठी रिंगरोडबाधित नागरिक गेल्या तीन महिन्यांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत. सभा, मोर्चा, चिंतन पदयात्रा, लाक्षणिक उपोषण, पोस्ट कार्ड पाठवा, स्मरण पदयात्रा, प्रबोधन अशा विविध मार्गाने नागरिक आंदोलन करत आहेत. भोसरीतील मुख्यमंत्र्यांच्या दौºयातही शिष्टमंडळाची भेट झाली नव्हती.
या प्रश्नाबाबत आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली आणि सत्ताधाºयांनी समिती निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वपक्षिय समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होती. त्यांच्याशी रिंगरोडच्या प्रश्नाबाबत चर्चा करणार होते. परंतु, एक महिना उलटून गेला तरी सर्वपक्षिय समिती मुख्यमंत्र्यांना भेटली नव्हती. त्यामुळे बाधित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या सर्वपक्षिय समितीमध्ये सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, अपक्षांचे कैलास बारणे यांचा समावेश आहे. रिंगरोडबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षिय समितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आठवड्यात वेळ दिला आहे.
रिंगरोडबाबत सर्वपक्षीय समिती मनापासून काम करीत नाही. समितीने मनापासून काम केल्यास यश नक्की मिळेल. त्यासाठी सर्वपक्षीय अवलोकन समितीने वेळेत आणि मनापासून काम करणे गरजेचे आहे. या समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांना री-अलायमेन्ट (पर्यायी रस्ता) अहवाल सादर करावा. त्यावर जरूर तोडगा निघेल.
- विजय पाटील, समन्वयक, घर बचाव संघर्ष समिती

Web Title: Talk about the ring road soon with the chief ministers, the possibility of a road exit from next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.