मोघलांचा इतिहास वगळण्याचे समर्थक बैल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 04:45 AM2017-08-19T04:45:58+5:302017-08-19T04:47:46+5:30

शालेय अभ्यासक्रमातून मोघलांचा धडा वगळण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारे विद्वान हे बैल आहेत.

The supporters of skipping the history of the Mughals | मोघलांचा इतिहास वगळण्याचे समर्थक बैल

मोघलांचा इतिहास वगळण्याचे समर्थक बैल

Next

पिंपरी : शालेय अभ्यासक्रमातून मोघलांचा धडा वगळण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारे विद्वान हे बैल आहेत. अशा बैलांना सरकारने दावणीला बांधू नये, अशी प्रखर टीका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली. त्यांच्या टीकेचा रोख डॉ. सदानंद मोरे यांच्यावर होता.
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावे दिल्या जाणाºया पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना सबनीस म्हणाले, राज्य सरकारने मोघलांचा इतिहास वगळून घोडचूक केली आहे. ती सुधारली पाहिजे. पण काही साहित्यिक मात्र या चुकीचे समर्थन करीत आहेत. केवळ सरकारी लाभ मिळवून घेण्यासाठीच ते सरकारच्या दावणीला बांधून घेत आहेत.
शालेय अभ्यासक्रमातून मोघलांचा धडा वगळण्याच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या निर्णयाचे डॉ. सदानंद मोरे यांनी समर्थन केले होते.
>...हा तर वांझोटा वाद
गणेशोत्सवाचे आद्य संस्थापक लोकमान्य टिळक की भाऊ रंगारी? हा सध्या सुरू असलेला वादही मुळात वांझोटा आहे. रंगारींनी घरातला गणपती सार्वजनिक गणपती म्हणून रस्त्यावर आणला असेल, तर त्या उत्सवाचे पहिले श्रेय त्यांना द्यायलाच हवे. महापुरुषांमध्ये जसे सामर्थ्य असते, तसेच मर्यादाही असतात, याचे भान समाजात जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत असले वांझोटे वाद सुरूच राहतील, अशी टीका सबनीस यांनी केली.
>सरकार झोपा काढतंय...
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांचे मारेकरी अजूनही सापडलेले नाहीत. यावर सबनीस म्हणाले, ‘‘दाभोलकरांचे मारेकरी मोकाट का आहेत? सरकार आणि तपास यंत्रणा गोट्या खेळत आहेत की, झोपा काढत आहेत? पोलीस यंत्रणेचे काम निषेधाच्याही पलीकडचे आहे. सगळे सरकार या प्रश्नावर पराभूत आहे, हे खेदाने सांगावे लागते.’’

Web Title: The supporters of skipping the history of the Mughals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.