पिंपरी : आजाराला कंटाळून राहत्या घरी गळफास घेवून भोसरीत युवकाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. राजेश्वर रमेश पहुरकर (वय ३६, रा. भोसरी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. राजेश्वर यांचे भाऊ दिनेश रमेश पहुरकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १२ वर्षांपासून राजेश्वर मानसिक आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे ते घरातच असायचे. सोमवारी सायंकाळी त्यांनी घरातील अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार घरातील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने राजेश्वर यांना पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गेल्या काही वर्षांपासून ते वैफल्यग्रस्त झाले होते. मानसिक नैराश्यामुळे ते कोठेही काम, धंदा करीत नव्हते. 
या प्रकरणी पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.