स्टायलिश बाईकला मागणी, तरुणाईमध्ये दुचाकीची क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 11:47 PM2018-11-12T23:47:56+5:302018-11-12T23:49:03+5:30

तरुणाईमध्ये क्रेझ : अनेक कंपन्यांनी केले वाहनांमध्ये बदल

A stylish bike demand, a bike trick in the youth | स्टायलिश बाईकला मागणी, तरुणाईमध्ये दुचाकीची क्रेझ

स्टायलिश बाईकला मागणी, तरुणाईमध्ये दुचाकीची क्रेझ

googlenewsNext

रहाटणी : ‘स्टायलिश बाईक’ खरेदी करण्याकडे तरुणांचा ओढा अधिक असल्याचे दिसून येत आहे. विविध कंपन्यांच्या ‘स्टायलिश’ बाईकची बुकिंग आणि विक्री झाल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. आज तरुणांबरोबरच इतर ग्राहकांचाही मायलेजबरोबरच स्टायलिश बाईक खरेदीकडे ओढा दिसून येतो. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्वच वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सर्वांच्याच पसंतीला पडतील अशा स्टायलिश बाईक बाजारात आणत आहेत.

तर कही वाहन उत्पादन कंपन्या आहे त्याच वाहनात बदल करून त्यात वेगळेपणा असल्याचे सांगत किमतीचा ताळमेळ बसवत वाहने बाजारात आणत आहेत. त्यामुळे सध्या वेगवेगळे स्टायलिश बाईक बाजारात दिसून येत आहेत. हिंदू धर्मामध्ये दिवाळी व पाडवा सणाला काही महत्त्वाचे खरेदीसाठी शुभमुहूर्त मानला जातो. त्यामुळे बहुतांश जण दिवाळीत व पाडव्याला नवीन वाहन खरेदी करतात. परंतु स्टायलिश वाहन खरेदीसाठी प्रथम नंबर लावावा लागत असल्याने काही नागरिक तर मुहूर्तदेखील पाहत नाहीत. मुलांचे लाड पुरविण्यासाठी मनासारखे वहान मिळताच खरेदी केली जात आहे़ काही जण फक्त मुहूर्त पाहूनच वाहन खरेदी-विक्री करतात. त्यामुळे असे वाहन उत्पादन करणाºया विविध कंपन्यांनी आपली नवनवीन आकर्षक वाहने बाजारात आणली आहेत. या वाहन बाजारात वाहन खरेदीची चांगलीच ‘धूम’ दिसून येत आहे.
सध्या दुचाकीमध्ये विशेषत: तरुणवर्ग स्टायलिश बाईककडे आकर्षित होत असल्याचे काही वाहन विक्रेत्यांनी सांगितले. पेट्रोलचे दर आकाशाला भिडलेले असल्याने दुचाकी मायलेज देणारी असावी, शिवाय ती स्टायलिशही असावी, असे ग्राहकांना वाटत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे दिवाळी पाडव्यानिमित्त वाहन बाजारात मोठी उलाढाल झाली व शेकडो स्टायलिश बाईक रस्त्यावर आल्या व येतील.
स्टायलिश बाईक बरोबरच मनपसंद वाहनांचा नंबर घेण्याकडेदेखील अनेक तरुणांचा कल दिसून येत आहे. शाळा कॉलेजमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण व्हावी तसेच आपली इतर तारुणांवर वेगळी छाप पडावी म्हणून काही तरुण मनपसंद वाहन क्रमांकासाठी हजारो रुपये खर्च करत आहेत़वाहन कार्यालयात नंबर लावण्यासाठी गर्दी होणार आहे तर कही तरुण वशिलेबाजी करत आहेत़ काही आमदार, खासदार मोठे अधिकारी यांच्या ओळखीचा फायदा घेत वशिला लावत आहेत.

धूम स्टाईल बाईकमुळे अपघातात वाढ
शाळा, कॉलेज व इतर तरुणांमध्ये धूम स्टाईल बाईक चालविण्याची जणू काय स्पर्धाच सुरू झाली की काय असे दिसून येत आहे. अनेक तरुण स्वत:चा जीव धोक्यात घालून व दुसºयालाही इजा पोहोचेल अशी बाईक चालवीत आहेत़ त्यामुळे अशा रफदार बाईकच्या वेगामुळे दररोज छोटेमोठे अपघात होऊन काही तरुण आपल्या प्राणाला मुकत आहेत तर दुसºयाच्याही मृत्यूस कारणीभूत ठरत आहेत़ यावर कुठेतरी अंकुश ठेवण्याची काळाची गरज आहे.

Web Title: A stylish bike demand, a bike trick in the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.