लोणावळ्यासाठी १६ कोटी रुपयांचा विशेष विकास निधी - सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 12:32 AM2018-12-23T00:32:29+5:302018-12-23T00:32:50+5:30

लोणावळा शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याकरिता उभारण्यात येणाऱ्या भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाकरिता १० कोटी रुपये व लोणावळा शहराच्या पर्यटन विकासात भर घालणारा प्रकल्प असलेल्या खंडाळा बोटिंगकरिता ६ कोटी रुपये विशेष्ां निधी देण्याची घोषणा वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

 Special development fund of Rs. 16 crores for Lonavla - Sudhir Mungantiwar | लोणावळ्यासाठी १६ कोटी रुपयांचा विशेष विकास निधी - सुधीर मुनगंटीवार

लोणावळ्यासाठी १६ कोटी रुपयांचा विशेष विकास निधी - सुधीर मुनगंटीवार

googlenewsNext

लोणावळा : लोणावळा शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याकरिता उभारण्यात येणाऱ्या भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाकरिता १० कोटी रुपये व लोणावळा शहराच्या पर्यटन विकासात भर घालणारा प्रकल्प असलेल्या खंडाळा बोटिंगकरिता ६ कोटी रुपये विशेष्ां निधी देण्याची घोषणा वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. लोणावळा नगर परिषदेच्या विविध विकासकामांची उद्घाटने मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आली.
या वेळी आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, आरोग्य समिती सभापती बिंद्रा गणात्रा, पाणी समिती सभापती पूजा गायकवाड, शिक्षण समिती सभापती जयश्री आहेर, बांधकाम समिती सभापती गौरी मावकर, मागास कल्याण समिती सभापती मंदा सोनवणे, नगरसेवक राजू बच्चे, दिलीप दामोदरे, बाळासाहेब जाधव, देविदास कडू, निखिल कवीश्वर, सुधीर शिर्के, संजय घोणे, भरत हारपुडे, सुवर्णा अकोलकर, संध्या खंडेलवाल, रचना सिनकर, प्रमोद गायकवाड, दत्तात्रय गवळी, विनय विद्वांस, बांधकाम अभियंते अरुण बेद्रे, उद्योजक आशिष वैद्य, शैलजा फासे, प्रशांत ढोरे, रवींद्र भेगडे, भाऊ गुंड हे मान्यवर उपस्थित होते.
लोणावळा नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात सातवा क्रमांक मिळविल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत वरसोली येथील कचराडेपोवर अत्याधुनिक पद्धतीने बायोगॅस प्रकल्प उभारला असून, अशा प्रकारे विविध प्रकल्प उभारण्यात आले आहे.

मुनगंटीवार म्हणाले, लोणावळा नगर परिषदेचा कचरा डेपो पाहिल्यावर खरंच तुम्ही कचºयाचे सोनं केलं आहे असे वाटते़ कचरा डेपोवर नव्हे तर कोठे पर्यटनस्थळावर आलो असल्याचा भास तेथे झाला. लोणावळा शहराला देशातील क्रमांक एकचे स्वच्छ शहर करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. नागरिकांनी आपली कर्तव्य व जबाबदारी ओळखल्यास लोणावळा शहर सुरेख व स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. आमदार बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यातील तर नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी लोणावळा शहरात सुरू असलेली व पूर्ण झालेली विकासकामे यांची माहिती या वेळी उपस्थितांना दिली.

Web Title:  Special development fund of Rs. 16 crores for Lonavla - Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.