श्रीरंग बारणे यांना पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 02:46 PM2019-01-16T14:46:06+5:302019-01-16T16:54:35+5:30

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

Shrirang Barane has been awarded the sansadratna Award for the fifth time | श्रीरंग बारणे यांना पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर

श्रीरंग बारणे यांना पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर

पिंपरी : मावळचे  खासदार श्रीरंग बारणे  यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल सलग  पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. १९ जानेवारी रोजी तामिळनाडू येथील राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी लोकसभेतील उल्लेखनीय  कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. खासदाराची संसदेतील कामगिरी त्यांचा विविध चर्चांमधील सहभाग, उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या, खासगी सदस्य विधेयक संख्या, सभागृहातील उपस्थिती यासंदर्भात पीआरएस इंडियाने दिलेल्या आकडेवारीवरुन कामगिरीची आढावा घेऊन लोकसभा सचिवालयामार्फत पुरवलेल्या माहितीवरुन याचे मूल्यांकन निवड समितीमार्फत केली जाते. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशन २०१९ पर्यंत खा.बारणेनी  ९३  टक्के उपस्थिती लावत, २८९  वेळा प्रत्यक्ष चर्चेत सहभाग नोंदवला. तारांकीत व अतांराकीत असे १०७६   प्रश्न उपस्थित करुन २०  खाजगी सदस्य विधेयकही मांडले. या अष्टपैलू कामगिरीवरुन खा.श्रीरंग बारणे  यांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.  या पुरस्कार निवड समितीत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री  अर्जुन मेघावाल, शिवसेनेचे  आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे. तामिळनाडू येथील राजभवनात कार्यक्रम होणार आहे.  यावेळी  राज्यपाल बनवारीलाल पुरोहित उपस्थिती राहणार आहेत.  सलग पाचव्यादा हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी १०७६ प्रश्न मांडले असून  २८९  वेळा चर्चेत सहभाग घेतला आहे. तर सभागृहात ९३ टक्के उपस्थिती सभागृहात होती.

Web Title: Shrirang Barane has been awarded the sansadratna Award for the fifth time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.