रेशन कार्यालयावर दुकानदारांचा कब्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 02:27 AM2018-07-18T02:27:17+5:302018-07-18T02:27:20+5:30

निगडीतील परिमंडळ अधिकारी कार्यालयात रेशनिंग दुकानदारांनीच कब्जा केला आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामेही थेट दुकानदारच केबिनमध्ये बसून करतात.

Shopkeepers capture at the Ration office | रेशन कार्यालयावर दुकानदारांचा कब्जा

रेशन कार्यालयावर दुकानदारांचा कब्जा

Next

- मंगेश पांडे 
पिंपरी : निगडीतील परिमंडळ अधिकारी कार्यालयात रेशनिंग दुकानदारांनीच कब्जा केला आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामेही थेट
दुकानदारच केबिनमध्ये बसून करतात. अधिकाºयांच्या केबिनसह रेकॉर्ड रूमही या दुकानदारांसाठी खुल्या असल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली. अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत दुकानदारांकडे असलेल्या शिधापत्रिका व त्यामध्ये नमूद असलेल्या व्यक्तींच्या प्रमाणात स्वस्त धान्य दुकानदारांना वितरणासाठी धान्य दिले जाते. यासाठी शिधापत्रिकेतील माहितीच्या संगणकीकरणासह आधार जोडणी आवश्यक आहे. आधारनोंदणी बंधनकारक केल्याने धान्य देण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे शिधापत्रिकेतील माहितीचे संगणकीकरण करण्यासह आधार जोडणीचे काम जोरात सुरू आहे. या कामकाजासाठी संगणकाला काही लॉग इन व पासवर्ड दिलेले आहेत.
विशेष कामकाजासाठी कार्यालयामार्फत काही कर्मचाºयांची नेमणूक करणेही आवश्यक आहे. मात्र, निगडीतील परिमंडळ अधिकारी कार्यालयात थेट दुकानदारांनी संगणकाचा कब्जा घेतला आहे. कार्यालयातील कर्मचारी अथवा कंत्राटी पद्धतीवर नेमलेल्या कर्मचाºयांऐवजी दुकानदारच हे काम करीत असल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये दिसून आले. त्यामुळे रेशनिंगवरील कुटुंबांच्या नावातील चुका, दुबार नावे व बोगस नोंदणीची शक्यता आहे.
>पासवर्ड होताहेत सार्वजनिक
निगडीतील संत तुकाराम व्यापार संकुल येथे असलेल्या परिमंडळ कार्यालय ‘अ’ अंतर्गत देहूरोड, निगडी, चिंचवड, सांगवी, पिंपळे गुरव, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव आदी भाग येतो, तर ‘ज’ अंतर्गत पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प, मोहननगर, खराळवाडी आदी भाग येतो. या परिसरातील शिधापत्रिकेशी संबंधित कामकाज या कार्यालयात चालते. कार्यालयातील संगणकाला लॉग इन आयडी, पासवर्ड देण्यात आले आहेत. त्यामुळे येथील माहिती सुरक्षित राहण्यास मदत होऊ शकते. मात्र, येथील संगणकांचा वापर कर्मचाºयांव्यतिरिक्त कोणीही करीत असल्याने संगणकाचे पासवर्डही सार्वजनिक होत आहेत.
रेकॉर्ड रूम वाºयावर
या कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये महत्त्वाची कागदपत्रे ठेवलेली असतात. या ठिकाणच्या कागदपत्रांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. मात्र, येथील रेकॉर्ड रूम म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ बनले आहे. कोणीही या रेकॉर्ड रूममध्ये शिरकाव करीत आहे. मात्र, कार्यालयातील कर्माचारी, अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून आले. अधिकारी कोण, कर्मचारी कोण आणि रेशन दुकानदार कोण याबाबत माहिती नसल्याने एखाद्या कामासाठी कार्यालयात येणाºया नागरिकांचा गोंधळ उडतो. दुकानदारच अधिकाºयांच्या केबिनमध्ये बसत असल्याने नागरिकही त्यांच्याकडे जाऊनच माहिती विचारतात. तेव्हा ते एजंटांना भेटण्यासाठी सांगतात.
कार्यालयातील संगणकावर शिधापत्रिकेतील माहितीचे संगणकीकरण करण्याचे काम केले जाते. कार्यालयीन कर्मचारी, तसेच आॅपरेटरमार्फत हे काम सुरू असते. दुकानदारांकडील पॉस मशिनमध्ये काही समस्या असल्यास कार्यालयात येऊन संगणकावर माहिती अपलोड करण्यासाठी त्यांची मदत घेतली जाते.
- संजना आंबोळे, सहायक परिमंडळ अधिकारी
>मंगळवार, दि. १७ जुलै २०१८, दुपारी १:०५ :
शिधापत्रिकेतील माहितीचे संगणकीकरण करण्यासाठी कार्यालयातील हॉलमध्ये तीन संगणक, परिमंडळ अधिकाºयांच्या कार्यालयात दोन संगणक, तर रेकॉर्ड रूममध्ये एक संगणक ठेवण्यात आला आहे. या संगणकांवर कामकाज सुरू असते. कार्यालयाच्या हॉलमध्ये असलेल्या दोन संगणकांसमोर दोन महिला बसल्या होत्या. यासह परिमंडळ अधिकाºयांच्या केबिनमधील दोन संगणकांपैकी एका संगणकावर कंत्राटी कर्मचारी, तर दुसºया संगणकावर एक व्यक्ती होती. शेजारीच असलेल्या रेकॉर्ड रूममध्येही एक संगणक असून, येथील संगणक दुकानदार हाताळत असल्याचे चित्र दिसून आले.

Web Title: Shopkeepers capture at the Ration office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.