शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळून केला पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 02:13 PM2019-02-15T14:13:27+5:302019-02-15T14:31:34+5:30

भारतीय लष्कराचे जवान बेसावध असताना त्यांच्यावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. त्याचा निषेध म्हणून शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुलभा उबाळे व शहरप्रमुख धनंजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली मोशी येथील शिवाजी चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळून हल्ल्याचा निषेध केला.

Shivsena fired Pakistan's flag to protesting against Pulwama terror attack | शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळून केला पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध

शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळून केला पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध

googlenewsNext

पिंपरी :  भारतीय लष्कराचे जवान बेसावध असताना त्यांच्यावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. त्याचा निषेध म्हणून शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुलभा उबाळे व शहरप्रमुख धनंजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली मोशी येथील शिवाजी चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळून हल्ल्याचा निषेध केला. शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी  परिसरातील देशप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते. पाकिस्तान मुदार्बाद, शाहिद जवान  अमर रहे अशा घोषणा देवून पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करण्यात आले. 
           
                 महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका, सुलभा रामभाऊ उबाळे म्हणाल्या, ‘‘भारतीय लष्कराचे जवान बेसावध असताना त्यांच्यावर पाकिस्तानी अतिरेक्यानी भ्याड हल्ला केला आहे. त्यात४४ जवान शहिद झाले. शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली. पाकिस्तानला धडा शिकविण्याची गरज आहे.’’

                मोशी येथील शिवाजी चौकात महिला आघाडी संघटिका वेदश्री काळे युवासेना प्रमुख सचिन सानप, शशिकला उभे, आशा भालेकर, परशुराम आल्हाट, रुपाली आल्हाट, जनाबाई गोरे सतीश मरळ, गणेश इंगवले, आबा लांडगे, अमित शिंदे, नंदा दाटकर,  स्मिता मोगरे, पुष्पां मुचुनडीकर, राजश्री पाटील, संकेत चिवटे, सुजाता आल्हाट, कल्पना आल्हाट, मयूर कुदळे, सुभाष महाजन, विश्वनाथ टेमगिरे, वैभव गिरी आकाश आल्हाट,  गणेश आल्हाट, मनोज आल्हाट, अनिकेत आल्हाट आदी उपस्थित होते.

Web Title: Shivsena fired Pakistan's flag to protesting against Pulwama terror attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.