शिवसेना-भाजपात वाक्युद्ध, लोकसभा निवडणुकीपूर्वीच रंगू लागला आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:58 AM2017-09-21T00:58:08+5:302017-09-21T00:58:10+5:30

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांमध्ये वाक्युद्ध सुरू झाले आहे.

In the Shiv Sena-BJP rhetoric, the Akhada began to taste before the Lok Sabha elections | शिवसेना-भाजपात वाक्युद्ध, लोकसभा निवडणुकीपूर्वीच रंगू लागला आखाडा

शिवसेना-भाजपात वाक्युद्ध, लोकसभा निवडणुकीपूर्वीच रंगू लागला आखाडा

googlenewsNext

पिंपरी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांमध्ये वाक्युद्ध सुरू झाले आहे. शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभा निवडणुकीत निवडून येऊन दाखवा, असे आव्हान भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी मंगळवारी दिले होते. त्यास खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी उत्तर दिले आहे. जगतापांचे आव्हान शुभशकुन असून, शिवसेनेवर टीका करणे हे बालिशपणाचे लक्षण असल्याचे उत्तर बारणे यांनी दिले आहे.
मुंबईतील शिवसेनेच्या बैठकीत भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यावरून पुणे जिल्ह्यातील दोन नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. त्यानंतर आमदार जगताप यांनी खासदार बारणे यांच्यावर पत्रक काढून टीका केली होती. गेल्या तीन दिवसांपासून शिवसेना आणि भाजपातील वाक्युद्ध रंगू लागले आहे. त्यास बारणे यांनी उत्तर दिले आहे.
खासदार बारणे म्हणाले, ‘‘अनेक दिवस जगताप कार्यकर्त्यांमार्फत टीकात्मक पत्रके काढून डिवचण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, काल त्यांनीच थेट टीका केली. जनसंपर्क, सर्वसामान्यांच्या सुख-दु:खामध्ये धावून जाणारी असलेली माझी प्रतिमा त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रवृत्ती, तसेच माझ्यातील लढाऊपणा व लोकसभेतील कामाचा चढता आलेख पाहून जनता माझ्याशी जोडली असून, कोणतेही कारण नसताना माझी धास्ती घेतल्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीला सव्वा वर्षापेक्षा जास्त कालावधी असताना उसने अवसान आणून आव्हान देत आहेत. बारणे उमेदवार असेल, तरच मी लोकसभा लढणार, असे आव्हान त्यांनी २०१४ च्या निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र, मी विजयी झालो. आता पुन्हा आव्हान दिले. हा शुभशकुनच आहे. टीका करताना त्यांनी स्वत:चा इतिहास तपासावा. भाजपामुळे मूठभर मांस अंगावर चढल्याने कदाचित कोणतेही कारण नसताना टीका करीत आहेत. तीन वर्षांपेक्षा कमी काळ भाजपामध्ये दाखल झालेले संपूर्ण राज्यातील, केंद्रातील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता मीच आणल्याचा आव आणून ऊर बडवत आहेत.
युतीतील खासदार आहे, हे मी विसरलो नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा कालावधी ते विसरले आहेत. लोकसभा लढण्यापूर्वी आमदारकीचा राजीनामा देण्याचे नाटक करून त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शेकापच्या गठ्ठा मतांवर डोळा ठेवून त्या पक्षात प्रवेश केला. शेकाप, मनसे आघाडी, राष्ट्रवादीची सर्व फौज बरोबर घेतली, तरीही पराभव पत्करावा लागला.
>श्रीरंग बारणे : टीका बालीशपणाचे लक्षण
मरेपर्यंत शेतकरी कामगार पक्ष सोडणार नाही, अशी शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तंबूत पुन्हा दाखल झाले. आत्मपरीक्षण करून टीका करावी. तीन वर्षांच्या लोकसभेतील कामकाजाचा लेखाजोखा केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तो त्यांनी पाहून घ्यावा. गेली १३ वर्षे विधानसभेमध्ये किती वेळा तोंड उघडले, हे देखील जनतेला सांगावे. शिवसेनेच्या अंतर्गत संवादाबाबत बोलण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? मातोश्रीच्या पायºया झिजवणाºयांना शिवसेना नेत्यांनी थारा दिला नाही, याचेच भान ठेवावे. समाजवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शेकाप, मनसेचा पाठिंबा, पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस, मोदी लाटेत भाजपा प्रवास करणाºयांनी निष्ठा शिकवू नये. टीका करणे त्यांचा बालिशपणा, सत्तेची व पैशाची मस्ती आहे, असे बारणे म्हणाले.

Web Title: In the Shiv Sena-BJP rhetoric, the Akhada began to taste before the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.