शेजा-यांमध्ये सांडपाण्यावरून होता वाद, कोयत्याने वार करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 06:16 AM2017-11-17T06:16:47+5:302017-11-17T06:17:01+5:30

घरासमोर सांडपाणी साचत असल्याच्या कारणावरून शेजाºयांमध्ये वारंवार वाद होत होता. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले़

 In Sheja, there was a dispute over sewage, murdered by coercive force | शेजा-यांमध्ये सांडपाण्यावरून होता वाद, कोयत्याने वार करून खून

शेजा-यांमध्ये सांडपाण्यावरून होता वाद, कोयत्याने वार करून खून

googlenewsNext

वाकड : घरासमोर सांडपाणी साचत असल्याच्या कारणावरून शेजाºयांमध्ये वारंवार वाद होत होता. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले़ ताथवडे येथे एकाने कोयत्याने वार करून ४० वर्षीय इसमाचा खून करण्यात आला. ही घटना सोनवणे वस्ती येथे गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. सतीश गुलाब सोनवणे (वय ४०, रा. सोनवणे वस्ती, ताथवडे), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दीपक सोनवणे (वय ४०) याला अटक केली आहे.
मृत सतीश सोनवणे यांच्या घरातील सांडपाणी आरोपीच्या घरासमोर साचत होते. तेच पाणी भिंतीत झिरपत असल्याने आरोपी सतीश यांना यावर उपाययोजना करण्यास सांगत होते. मात्र, उपाययोजना केली जात नसल्याने आरोपी दीपक याचा रागाचा पारा चढला. त्यांच्यात गुरुवारी सकाळीच वादंग झाले. शाब्दिक चकमक, शिवीगाळ यानंतर ते दोघेही हमरी तुमरीवर आले. आरोपी दीपक कोयता घेऊन आला. त्याने सतीशवर सपासप कोयत्याने वार केले. सतीशच्या चेहºयावर गंभीर जखमा झाल्या. शरीरावर अन्य ठिकाणी वार झाल्याने गंभीर जखमी सतीशचा मृत्यू झाला. आरोपीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. वाकड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा
दाखल केला आहे. ताथवडेत मंगळवारी एका तरुणास टोळक्याने वार करून जखमी केले. हल्ल्याची घटना ताजी असताना, ताथवडेतील सोनावणे वस्तीत गुरुवारी सकाळीच खुनाची घटना घडली. खून प्रकरणातील आरोपीवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत.

Web Title:  In Sheja, there was a dispute over sewage, murdered by coercive force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.