शिवसेना गटनेत्यांकडे खंडणीची मागणी; तिघांविरोधात लोणावळा पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:37 AM2018-01-17T11:37:30+5:302018-01-17T11:40:42+5:30

शिवसेनेच्या विरोधी पक्ष गटनेत्या शादान चौधरी यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी ३ जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ransom demand for Shiv Sena group leaders; Lonavala police filed a complaint against three people | शिवसेना गटनेत्यांकडे खंडणीची मागणी; तिघांविरोधात लोणावळा पोलिसांत गुन्हा दाखल

शिवसेना गटनेत्यांकडे खंडणीची मागणी; तिघांविरोधात लोणावळा पोलिसांत गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देदुचाकी गाडीवरुन आलेल्या ३ जणांनी गाडी आडवत आपल्याकडे केली पाच लाख रुपयांची मागणीखंडणी मागणार्‍या व्यक्तींना तातडीने अटक करत सखोल चौकशीची शिवसेनेची मागणी

लोणावळा : शिवसेनेच्या विरोधी पक्ष गटनेत्या शादान चौधरी यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी ३ जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौधरी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. 

चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या सोमवारी हुडको कॉलनी येथील अनाथ आश्रमात मुलांना नाष्टा घेऊन जात असताना अचानक गाडीसमोर दुचाकी गाडीवरुन आलेल्या ३ जणांनी गाडी आडवत आपल्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करत धमकावले असल्याचे सांगितले. यावेळी चौधरी यांनी तशीच गाडी पोलीस ठाण्यात घेऊन जात घडल्या प्रकाराची तक्रार दिली. याप्रकरणी ३ अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणावळा शहरचे सहायक पोलीस निरीक्षक रानगट हे तपास करत आहेत.

यापूर्वी नगरसेवक व अधिकारी यांच्या नावे शहराच्या विविध भागातील बंगलेधारक व बांधकाम व्यावसायिक यांना धमकाविण्याचे, पैसे उकळण्याच्या घटना लोणावळ्यात घडल्या आहेत. बनावट नोटिसा प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. आता मात्र नगरसेविकेला खुलेआम भररस्त्यात धमकावत खंडणी मागण्याची घटना घडल्याने लोणावळा शहराची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरु आहे याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. 

दरम्यान खंडणी मागणार्‍या व्यक्तींना तातडीने अटक करत प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

Web Title: Ransom demand for Shiv Sena group leaders; Lonavala police filed a complaint against three people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.