शहाण्णव कुळी शेतकरी शब्दांवरुन सत्ताधारी-विरोधकांनी काढली एकमेकांची उणीदुणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 09:55 PM2018-09-19T21:55:09+5:302018-09-19T21:57:41+5:30

शहाण्णव कुळी शेतकरी मुद्यावरून भाजपाने राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. 

quarralwith weakpoint of each other in pimpri corporation | शहाण्णव कुळी शेतकरी शब्दांवरुन सत्ताधारी-विरोधकांनी काढली एकमेकांची उणीदुणी 

शहाण्णव कुळी शेतकरी शब्दांवरुन सत्ताधारी-विरोधकांनी काढली एकमेकांची उणीदुणी 

Next
ठळक मुद्देकुत्र्यांचा त्रास व शहाण्णव कुळी शेतकरी या विषयावरून आजची सर्वसाधारण सभा गाजली.

पिंपरी : मी शहाण्णव कुळी शेतकरी आहे. पाळीव प्राण्याची कशी काळजी घेतले जाते हे आम्हास चांगलेच ठावूक आहे. या विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या वाक्याचा भारतीय जनता पक्षाने निषेध केला आहे. यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांची उणीदुणी काढली. 
कुत्र्यांचा त्रास या विषयावरून आजची सर्वसाधारण सभा गाजली. त्यात माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी पिल्लांवर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडली. गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते साने यांच्यात जुंपली होती. शहाण्णव कुळी शेतकरी मुद्यावरून भाजपाने राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. 
साने म्हणाले, मी ९६ कुळी शेतकरी असून असून गाय म्हैस,बैल,कुत्रा,मांजर हि जनावरे पाळण्याची आमची परंपरागत संस्कृती आहे. हे सर्व प्राण्यांकडे आमच्या कुटूंबियांचे सदस्य म्हणून पाहतो. त्यांना पोटच्या पोरापेक्षा जास्त सांभाळतो. यामध्ये कुठलाही जातीचा उद्देश ठेवून मी हे वक्तव्य केलेले नाही. उलट ९६ कुळी या शब्दाबाबत राजकारण करुन भाजपा राजकीय हीन राजकारण करत आहे.पंतप्रधान आवास योजनाच्या निविदेमध्ये झालेल्या भष्ट्राचारच्या चौकशी मागणी केली आहे तसेच कचरा संकलन निविदा , ४२५ कोटीचे रस्ते विकास योजना, वारक-यांसाठी ताडपत्री खरेदी, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आदी प्रकरणांमधिल गैरव्यवहार व भष्ट्राचारबाबत सत्ताधा-यांचे बुरखे फाडण्याचे काम  केले आहे. जी कुत्र्याची पिल्ले आणली होती ती सहा महिन्याची होती ते ज्या पिशवीत आणली त्या पिशवीला छिद्रे असल्यामुळे त्या पिशवीत हवा खेळती राहिल याची दक्षता घेतली होती. 
राष्ट्रवादीच्या नाचा निषेध भाजपाने केला आहे. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, स्टंटबाजी करणे राष्ट्रवादीची संस्कृतीच आहे. त्यावर आजचा प्रकार कळसच होतो. आंदोलन करावे ते सनदशीर मार्गाने असावे.विकास डोळस म्हणाले,राष्ट्रवादीचे साने यांनी आंदोलनावर बोलताना उपरोधिक पणे मी शहाण्णव कुळी शेतकरी आहे. असे जातीवाचक विधान केले. त्याचा आम्ही निषेध करतो.
आशा शेडगे म्हणाल्या, एखाद्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुक्या प्राण्यांचा छळ करण्याची हा कोणती पध्दत? महिला सदस्यांना जातीवाचक बोलणे या प्रकाराचा निषेध करते. पुरोगामी म्हणून मिरविणाऱ्याची नवी संस्कृती आहे.जातीवाचक बोलणे चुकीचे आहे. यावेळी सागर आंगोळकर, उषा मुंढे, सुजाता पालांडे यांनी निषेध केला.

Web Title: quarralwith weakpoint of each other in pimpri corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.