कोंडीतून होणार चालकांची सुटका, उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरचे काम प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:18 AM2018-12-22T01:18:55+5:302018-12-22T01:24:18+5:30

रहाटणी येथील साई (जगताप डेअरी) चौकातील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या उड्डाणपुलाचे एका लेनचे काम पूर्ण झाले असल्याने वाहनचालकांना काही प्रमाणात का होईना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार आहे.

In progress, the release of drivers, flyovers and grade separator work will be progressed | कोंडीतून होणार चालकांची सुटका, उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरचे काम प्रगतिपथावर

कोंडीतून होणार चालकांची सुटका, उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरचे काम प्रगतिपथावर

googlenewsNext

रहाटणी : येथील साई (जगताप डेअरी) चौकातील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या उड्डाणपुलाचे एका लेनचे काम पूर्ण झाले असल्याने वाहनचालकांना काही प्रमाणात का होईना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार आहे. मात्र ही सुटका लवकरात लवकर मिळावी, अशी अपेक्षा वाहनचालक व्यक्त करीत आहेत.

सांगवी फाटा ते किवळे या बीआरटीएस मार्गावर रहाटणीतील साई चौक येथे ११० मीटर लांब व आठ मीटर रुंद अशा दोन लेनच्या उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले. या कामासाठी काळेवाडी फाट्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. सातत्याने वाहतूककोंडी होत आहे. ती सुटावी म्हणून काळेवाडी फाट्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या लेनचे काम पूर्ण करण्यात आले. असे असले, तरीही ही लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आलेली नाही.

या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, दुसºया टप्प्यातील सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसºया टप्प्यातील काम पूर्ण करण्यासाठी पुलाच्या शेजारी असणाºया उच्च दाबाच्या वीजवाहिनीच्या मनोºयाचे खांब हटविण्यात येत आहेत.

रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात हिंजवडीकडे जाणाºया चाकरमान्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शिवार चौकातून हिंजवडीकडे जाणाºया व येणाºया मार्गावर मोठी वर्दळ असते. असे असतानाच काळेवाडी फाट्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूकही उड्डाणपुलाच्या कामामुळे साई चौकातून शिवार चौकाकडे वळवण्यात आली. त्यामुळे या चौकात वाहतूककोंडी होते.
काम पूर्ण झालेली उड्डाण पुलाची लेन वाहतुकीसाठी खुली केल्यास वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल.


 

Web Title: In progress, the release of drivers, flyovers and grade separator work will be progressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.