इलेक्शन ड्यूटीवर गैरहजर असल्याबाबत फोनवरून विचारणा केल्याने मुख्याध्यापकाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 12:52 PM2019-04-28T12:52:24+5:302019-04-28T12:53:53+5:30

इलेक्शन ड्यूटीवर गैरहजर असल्याने फोन करून विचारणा केल्यावरून मुख्याध्यापकांना केबिनमध्ये घुसून फ्लॉवरपॉट फेकून मारला. ही घटना तळवडे येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिरमध्ये घडली.

principal beaten up for asking about absent for election duty | इलेक्शन ड्यूटीवर गैरहजर असल्याबाबत फोनवरून विचारणा केल्याने मुख्याध्यापकाला मारहाण

इलेक्शन ड्यूटीवर गैरहजर असल्याबाबत फोनवरून विचारणा केल्याने मुख्याध्यापकाला मारहाण

Next

पिंपरी : इलेक्शन ड्यूटीवर गैरहजर असल्याने फोन करून विचारणा केल्यावरून मुख्याध्यापकांना केबिनमध्ये घुसून फ्लॉवरपॉट फेकून मारला. ही घटना तळवडे येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिरमध्ये घडली. 

एकनाथ सोपानराव आंबवले (वय ४५, रा. श्रद्धा पार्क, कृष्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार  पोलिसांनी अनिल बाबू जाधव (वय २२, रा. स्वामी विवेकानंद नगर, वाल्हेकर वाडी, चिंचवड) व रिषा मल्लेश चव्हाण (वय २४, रा. शिवाजी चौक, वाल्हेकर वाडी, चिंचवड) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एकनाथ आंबवले हे नवनगर शिक्षण मंडळाच्या तळवडे येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर मध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे सध्या त्यांना बुथ लेवल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले आहे. शनिवारी दुपारी १ वाजता सीमा भिल्ला राठोड या निवडणुकीच्या ड्यूटीवर गैरहजर असल्याने मुख्याध्यापक आंबवले यांनी त्यांना फोन केला. यावरून अनिल जाधव व रिषा चव्हाण यांनी शाळेत येऊन मुख्याध्यापकाच्या अंगावर धावून गेले. त्यांना शिवीगाळ व हाताने मारहाण करून फ्लॉवरपॉट फेकून मारला. चिखली पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Web Title: principal beaten up for asking about absent for election duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.