क्रांतीवीर दामोदर चापेकर यांच्या नावाचे टपाल तिकीट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 08:22 PM2018-07-04T20:22:41+5:302018-07-04T20:31:16+5:30

केंद्र सरकारने दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्यास परवानगी दिली आहे. चापेकरांच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित होणे, ही पिंपरी-चिंचवड शहरवासियांसाठी अभिमानाची बाब आहे.

Post ticket in the name of revolutionary Damodar Chapekar | क्रांतीवीर दामोदर चापेकर यांच्या नावाचे टपाल तिकीट 

क्रांतीवीर दामोदर चापेकर यांच्या नावाचे टपाल तिकीट 

Next
ठळक मुद्देलोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते रविवारी प्रकाशन चिंचवडगाव येथील क्रांतीतीर्थ चापेकरवाडा येथे रविवारी ८ जुलैला दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रम होणार

पिंपरी : क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते येत्या रविवारी चिंचवड गावातील चापेकर वाडयात टपाल तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरात येणार आहेत.
चिंचवडगाव येथील क्रांतीतीर्थ चापेकरवाडा येथे रविवारी ८ जुलैला दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी  केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, महाराष्ट्र व गोवा राज्याचे मुख्य पोस्टमास्तर हरिश अगरवाल, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे आदी उपस्थित राहणार आहेत. 
खासदार बारणे याबाबत माहिती देताना म्हणाले, क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांनी १८९७ मध्ये वाल्टर चार्ल्स रॅण्डचा वध केला. रॅन्डचा वध केल्यामुळे इंग्रजानी चापेकर बंधुना फासावर चढविले. स्वातंत्र्य संग्रामासाठी चापेकर कुटुंबातील तीन बंधू शहीद झाले. क्रांतीवीर चापेकरांच्या नावाने टपाल तिकिटाचे प्रकाशन व्हावे, यासाठी सलग तीन वर्ष पाठपुरावा केला.चापेकरांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे सर्व पुरावे संबंधित मंत्रालयात दिले होते. क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी आवश्यक ती कागदपत्र उपलब्ध करून देण्यास मदत केली.
केंद्र सरकारने दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्यास परवानगी दिली आहे. चापेकरांच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित होणे, ही शहरवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी केली.तिकीटाच्या प्रकाशन सोहळयाच्या निमित्ताने लोकसभेच्या विद्यमान अध्यक्षा सुमित्रा महाजन पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत.

Web Title: Post ticket in the name of revolutionary Damodar Chapekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.