दोन गटातील वादातून पोलिसांना धक्काबुकी : दहा जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 08:13 PM2019-07-14T20:13:15+5:302019-07-14T20:21:56+5:30

पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल करताना पोलीस चौकीतच दोन गट आपसांत भिडले. दोन्ही गटातील लोकांनी पोलिसांनाही धक्काबुक्की केली.

Police mishap in police station by two groups | दोन गटातील वादातून पोलिसांना धक्काबुकी : दहा जणांना अटक 

दोन गटातील वादातून पोलिसांना धक्काबुकी : दहा जणांना अटक 

googlenewsNext
ठळक मुद्देचिखलीतील साने चौक पोलीस चौकीतील प्रकार 

पिंपरी : पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल करताना पोलीस चौकीतच दोन गट आपसांत भिडले. दोन्ही गटातील लोकांनी पोलिसांनाही धक्काबुक्की केली. हा प्रकार रविवारी सकाळी दहाच्या सुमारास साने चौक पोलीस चौकी येथे घडला. पोलिसांनी याप्रकरणी दहा जणांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
   अमोल संजय पवार, आशिष ज्ञानेश्वर गवळी, सचिन बाळासाहेब येलकेवाढ, अरुण दौलत पवार, गोरख दशरथ डुकळे, सतीश किसन जाधव, अर्जुन दशरथ पिटेकर, योगेश कैलास कदम, अनिल विठ्ठल खंडागळे, संदीप भारत डुकळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कैलास गेनबा डुकळे आणि त्याचे साथीदार अद्याप फरार आहेत. पोलीस उपनिरीक्षक यु.बी. ओमासे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. 
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रात्री दारू पिण्यासाठी बसले. त्या दारूचे पैसे देण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. त्याबाबत ते साने चौक पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक यु बी ओमासे चौकीत होते. त्यावेळी दोन्ही तक्रारदारांच्या बाजूने २५ ते ३० लोक जमा झाले. पोलीस चौकीसमोर बेकायदेशीर जमाव जमवून आपसात एकमेकांना शिवीगाळ करू लागले. त्यानंतर दोन्ही गट आपसात भिडले आणि मारहाण करू लागले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक ओमासे यांनी आरोपींना समजावण्याच्या प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी ओमासे आणि त्यांच्या पोलीस कर्मचाºयांना धक्काबुक्की केली. 
 जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Police mishap in police station by two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.