दिवाळीत पीएमपीएमएलचे उत्पन्न घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 12:14 AM2018-11-15T00:14:59+5:302018-11-15T00:15:27+5:30

आर्थिक नुकसान : सुटीनिमित्त प्रवासी संख्या कमी झाल्याचा परिणाम

PMPML returns in Diwali | दिवाळीत पीएमपीएमएलचे उत्पन्न घटले

दिवाळीत पीएमपीएमएलचे उत्पन्न घटले

Next

पिंपरी : दिवाळीत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) निगडी आणि पिंपरी आगाराच्या उत्पन्नास मोठा फटका बसला. दिवाळीच्या पाच दिवसांत दररोज दीड ते दोन लाखांनी उत्पन्न घटले. शहरात निगडी, भोसरी, पिंपरी असे तीन पीएमपीचे आगार असून, येथून या बस सुटतात. तीनही आगारांना दररोज चांगले उत्पन्न मिळते. मात्र, यंदा दिवाळीत ६ ते १० नोव्हेंबर या कालावधीत भोसरी आगार वगळता निगडी व पिंपरी आगाराचे उत्पन्न दीड ते दोन लाखांनी घटले आहे.

निगडी आगाराला दररोज सरासरी १० लाख ५० हजार ते ११ लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, दिवाळीत हे उत्पन्न घटले. ७ आणि ८ नोव्हेंबरला आठ ते साडेआठ लाखांचे उत्पन्न मिळाले. तर ९ आणि १० नोव्हेंबरला हा आकडा नऊ लाखांपर्यंतच पोहोचला. दिवाळीत दररोज दीड ते दोन लाखांनी उत्पन्न घटले. या आगारातून ३४ मार्गांवर बस धावतात. यामध्ये ८७ खात्याच्या तर ११७ भाड्याच्या बसचा समावेश आहे.
पिंपरी आगाराला साडे नऊ लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळत असते. मात्र, दिवाळीत दोन ते सव्वा दोन लाखांनी कमी उत्पन्न मिळाले आहे. या आगारातून ३१ मार्गांवर बस धावतात. यामध्ये १४१ खात्याच्या तर २५ भाड्याच्या बस आहेत. भोसरी आगाराला दिवाळीच्या पाच दिवसात सरासरी साडेनऊ लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळाले. विविध मार्गांवर पुरेशा प्रमाणात बस सोडण्यासह राजगुरुनगर ते भोसरी आणि भोसरी ते पुणे स्टेशन या मार्गावरील बसच्या फेऱ्या पुरेशा ठेवल्याने चांगले उत्पन्न मिळाले.

४पीएमपीएल बसने प्रवास करणाºयांमध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह नोकरदार वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. दरम्यान, दिवाळीत शाळा, महाविद्यालयांसह शासकीय कार्यालये तसेच विविध कंपन्यांनाही सुट्या असतात. त्यामुळे बाहेरगावाहून कामानिमित्त शहरात आलेले अनेक जण दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी जातात. यासह काही जण शहरात असले तरी सुटीत घराबाहेर पडत नसल्याने त्यांचा बसने जास्त प्रवास होत नाही. त्यामुळे दिवाळीत बसने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्याही कमी असते. तसेच उत्पन्नावरही परिणाम होतो.

दिवाळीत आगाराला मिळालेले उत्पन्न

पिंपरी आगार - (६ नोव्हेंबर) ७ लाख १ हजार, (७ नोव्हेंबर) ४ लाख ८८ हजार, (८ नोव्हेंबर) ६ लाख ४७ हजार, (९ नोव्हेंबर) ७ लाख ७१ हजार, (१० नोव्हेंबर) ७ लाख ६ हजार.

निगडी आगार- (६ नोव्हेंबर) १० लाख, (७ नोव्हेंबर) ८ लाख, (८ नोव्हेंबर) ८ लाख ५० हजार, (९ नोव्हेंबर) ९ लाख, (१० नोव्हेंबर) ९ लाख.

 

Web Title: PMPML returns in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.