अ‍ॅपच्या ऑफरमधून नागरिकांची होतेय लूट; ‘बॅड लक, ट्राय नेक्स्ट टाइम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:45 AM2019-01-15T00:45:00+5:302019-01-15T00:46:04+5:30

- मंगेश पांडे  पिंपरी : आमच्या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आॅनलाइन व्यवहार करून लाखो रुपये जिंका, कूपन मिळवा बक्षिसे जिंका अशा ...

The plunder of citizens from the app's offer; 'Bad luck, try next time' | अ‍ॅपच्या ऑफरमधून नागरिकांची होतेय लूट; ‘बॅड लक, ट्राय नेक्स्ट टाइम’

अ‍ॅपच्या ऑफरमधून नागरिकांची होतेय लूट; ‘बॅड लक, ट्राय नेक्स्ट टाइम’

googlenewsNext

- मंगेश पांडे 


पिंपरी : आमच्या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आॅनलाइन व्यवहार करून लाखो रुपये जिंका, कूपन मिळवा बक्षिसे जिंका अशा प्रकारच्या ऑफर रोजच मोबाइलवर धडकत असतात. मात्र, प्रत्यक्षात कसलेही बक्षीस मिळत नसल्याने ऑफरच्या केवळ अफवाच ठरत असल्याचे दिसून येत आहे.


ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्यांकडून वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात. मात्र, या ऑफर अनेकदा अफवा ठरत असून, यातून नागरिकांची फसवणूकही होत असल्याचे समोर येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे लढविले जात असून, यामध्ये नागरिकही गुरफटले जातात. मात्र, यातून आपली फसवणूक होत असल्याबाबत नागरिक अनभिज्ञ असतात. या माध्यमातून आर्थिक फटका बसल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते.


असाच प्रकार निगडीतील एका व्यक्तीबाबत घडला. त्या व्यक्तीने एक अ‍ॅप्लिकेशन मोबाइलमध्ये डाउनलोड केले. त्यामधून एका कंपनीने आॅनलाइन व्यवहार करण्यास सांगत या अ‍ॅप्लिकेशनद्वारे व्यवहार केल्यास बक्षीस मिळेल, असे आमिष दाखविले. त्यामुळे त्या व्यक्तीने हजार रुपयांची खरेदी करीत संबंधित कंपनीच्या अ‍ॅपद्वारे पैसे जमा केले. त्यानंतर काही दिवसांनी एक लाख रुपयांचे कूपन लागले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ठरावीक दिवशी कूपन स्क्रॅच केले असता, बक्षीस लागले नाही.


अनेक वेळा असे व्यवहार करताना अकाउंटमधून परस्पर पैशांची कपात होते. पण व्यवहार रद्द केल्यास संबंधिताला पैसे आॅनलाइन परत मिळत नाहीत. पैसे परत मिळविण्यासाठी बँकेत प्रत्यक्ष जावे लागते आणि आॅफलाइनच व्यवहार करावा लागतो.

पदरी पडते निराशा : कुपन स्क्रॅच करून हाती काहीच नाही
सध्या आॅनलाइन व्यवहाराला प्राधान्य देण्याच्या नावाखाली सर्रासपणे ग्राहकांची फसवणूक केली जाते. ग्राहकाकडे उपलब्ध डेबिट कार्डद्वारे देखील आॅनलाइन खरेदी केली जाऊ शकते. मात्र, वेगवेगळ्या कंपन्यांनी तयार केलेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून आॅनलाइन रक्कम जमा केल्यास विविध आॅफर दिल्या जात आहेत.
अमुक एका अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे जमा केल्यास तुम्हाला ठरावीक दिवसांत कूपनच्या माध्यमातून अमुक रकमेचे बक्षीस मिळेल, असे सांगितले जाते. मात्र, ठरवून दिलेल्या दिवशी कूपन स्क्रॅच केल्यास काहीही हाती लागत नाही. केवळ ‘बॅड लक, ट्राय नेक्स्ट टाइम’ असा मेसेज येतो. त्यामुळे ग्राहकाच्या पदरी निराशा पडते.

आमिषाला पडतात बळी
ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आॅफर दिल्या जातात. विविध प्रकारची बक्षिसे असल्याचे सांगितले जाते. आमिषाला बळी पडत ग्राहक संबंधित कंपनी सूचना देईल त्याप्रमाणे मोबाइलवरून आॅनलाइन व्यवहाराची प्रक्रिया करीत राहतात. मात्र, प्रत्यक्षात हाती काहीच पडत नाही. एका अ‍ॅपद्वारे खरेदी करा; ९० टक्के सवलत आहे असा मेसेज सध्या फिरत आहे. हा मेसेज दहा जणांना पाठविल्यानंतर तुम्हाला आकर्षक वस्तू मिळेल, असे सांगण्यात येते. पण दहा जणांना मेसेज करून ग्राहकांना काहीही मिळत नसल्याने एकप्रकारे ग्राहकराजाची केवळ फसवणूकच होते.

खात्याची माहिती
अ‍ॅप डाऊनलोड करताना बँक खात्यासह डेबिट कार्डची माहिती भरली जाते. दरम्यान, संबंधित कंपनीकडे त्या व्यक्तीच्या बॅँक खात्याची माहिती राहत असल्याने धोका पोहोचू शकतो.

Web Title: The plunder of citizens from the app's offer; 'Bad luck, try next time'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल