पिंपरी चिंचवड : डिझेल ओतून पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न, आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 11:02 AM2018-02-14T11:02:07+5:302018-02-14T11:46:05+5:30

पतीनं पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Pimpri Chinchwad: case Filed against the accused husband, who tried to burn wife | पिंपरी चिंचवड : डिझेल ओतून पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न, आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : डिझेल ओतून पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न, आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल

Next

पिंपरी-चिंचवड - पतीनं पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  चिंचवडे नगरमधील वाल्हेकरवाडी येथील घटना आहे. या घटनेत विवाहित महिला 30 टक्के भाजल्याची माहिती समोर आली आहे. हर्षदा उमेश कांबळे (वय 21) असे विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती उमेश मल्हारी कांबळे (वय 36) हर्षदाला सातत्याने त्रास देत होता. तिचा शारीरिक आणि  मानसिक छळ केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 13 फेब्रुवारीलाही दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास उमेशनं तिला डिझेल टाकून जिवंत पेटवण्याचा प्रयत्न केला आणि तिला खोलीत कोंडून ठेवले. शारीरिक, मानसिक छळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती उमेश विरोधात चिंचवड पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Pimpri Chinchwad: case Filed against the accused husband, who tried to burn wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.