भीषण आगीच्या दोन घटनांनी पिंपरी चिंचवड परिसर होरपळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 07:45 PM2019-05-21T19:45:31+5:302019-05-21T19:50:26+5:30

भोसरी एमआयडीसीतील इंद्रायणी कॉर्नर येथे सेंच्युरी एंका कंपनी आहे.

Pimpri Chinchwad area was surrounded by two incidents of horrific fire | भीषण आगीच्या दोन घटनांनी पिंपरी चिंचवड परिसर होरपळला

भीषण आगीच्या दोन घटनांनी पिंपरी चिंचवड परिसर होरपळला

googlenewsNext

पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीसह पिंपरीतील एका मोबाईलच्या दुकानाला मंगळवारी आग लागली. एकाच दिवसांत घडलेल्या या आगीच्या दोन घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भोसरी एमआयडीसीतील इंद्रायणी कॉर्नर येथे सेंच्युरी एका कंपनी आहे. या कंपनीतील एका प्लँटला सकाळी १० वाजून २० मिनिटांनी अचानक आग लागली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यामध्ये महापालिकेच्या संत तुकाराम अग्निशामक केंद्राच्या चार तसेच भोसरी, तळवडे, प्राधिकरण येथील गाड्यांसह चाकण एमआयडीसी, टाटा मोटर्स, बजाज, आणि सेंचुरी एन्का कंपनीच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. येथे मोठ्याप्रमाणात धूर असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना काहीसा त्रास झाला. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. 


    तर दुसरी घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरी येथील साई चौकातील आनंद मोबाईल शॉपी येथे घडली. मंगळवारमुळे मार्केट बंद असल्याने मोबाईलचे दुकानही बंद होते. दरम्यान, दुपारी साडेबाराच्या सुमारास दुकानातून अचानक मोठ्याप्रमाणात धूर बाहेर येवू लागल्याने ही घटना उघडकीस आली. त्यानंतर नागरिकांनी तातडीने याबाबत अग्निशामक दलाला माहिती दिली. काही वेळातच अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. पॅनल बोर्डमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने दुकानाला आग लागल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
    उपअग्निशामक अधिकारी अशोक कानडे, ऋषिकांत चिपाडे, संदीप जगताप, फायरमन प्रतिक कांबळे, अशोक बर्वे, महेंद्र फाटक, विशाल जाधव, चैतन् माने, नामदेव शिंगाडे, सुरज गवळी, विठ्ठल भुसे, अमोल खंदारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Pimpri Chinchwad area was surrounded by two incidents of horrific fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.