थकबाकी भरल्यास दंड होणार माफ, नागरिकांना ९० टक्क्यांपर्यंत सवलतीला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:43 AM2018-09-26T02:43:41+5:302018-09-26T02:43:54+5:30

महापालिकेच्या वतीने आगाऊ मिळकतकर भरून घेतला जातो. थकबाकीवर सहामाही व नऊमाहीनंतर प्रत्येक महिन्यास बिलावर दोन टक्के दराने दंड आकारला जातो.

PCMC : citizens upto 90% discount in Tax Pay | थकबाकी भरल्यास दंड होणार माफ, नागरिकांना ९० टक्क्यांपर्यंत सवलतीला मंजुरी

थकबाकी भरल्यास दंड होणार माफ, नागरिकांना ९० टक्क्यांपर्यंत सवलतीला मंजुरी

Next

पिंपरी  - महापालिकेच्या वतीने आगाऊ मिळकतकर भरून घेतला जातो. थकबाकीवर सहामाही व नऊमाहीनंतर प्रत्येक महिन्यास बिलावर दोन टक्के दराने दंड आकारला जातो. दंडावर सवलतीची अभय योजना राबविली आहे. आॅक्टोबर महिन्यात थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर जमा करणाऱ्या मिळकतधारकांना ७५ ते ९० टक्के दंड माफ केला जाणार आहे. या संदर्भातील प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली.
महापालिकेच्या वतीने मिळकतकराची वसुली केली जाते. महापालिका क्षेत्रात १६ विभागीय करसंकलन कार्यालये आहेत. तिथे मिळकतकर जमा केला जातो. सन २०१०-२०११पासून थकीत मिळकतकरावर आॅक्टोबर आणि जानेवारीनंतर प्रत्येक महिन्यास बिलावर दोन टक्के दराने दंड आकारला जातो. वर्षानुवर्षे मालमत्ता बंद असल्याने, मालक व भाडेकरू वाद, तसेच कौटुंबिक वाद, न्यायालयीन प्रकरण, रस्ता रुंदीकरणामध्ये पूर्ण किंवा काही प्रमाणात पाडलेली मालमत्ता
आणि आर्थिक परिस्थिती आदी कारणांमुळे मिळकतकर भरला जात नाही. परिणामी कराची थकबाकी वाढत आहे.
अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, ‘‘महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या सवलत योजनेचा लाभ घेऊन थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरावा. या अभय योजनेच्या प्रसिद्धीसाठी करसंकलन विभागातर्फे जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.’’ 

मिळकतधारकांना १५ आॅक्टोबरची मुदत
थकीत मिळकतकर वसूल व्हावा म्हणून महापालिकेने या दोन टक्के दंडाच्या रकमेत सवलत देण्याची योजना जाहीर केली आहे. थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर १ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत भरणाºया नागरिकांना दंडामध्ये ९० टक्के सूट दिली जाणार आहे, तर ३१ आॅक्टोबर या कालावधीत थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरणाºया नागरिकांना दंडात ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. या संदर्भातील विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

Web Title: PCMC : citizens upto 90% discount in Tax Pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.