कामगारानेच केला मालकाचा खून, सांगवीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 04:54 AM2018-03-21T04:54:05+5:302018-03-21T04:54:05+5:30

सांगवी येथील समर्थनगर येथे सोमवारी सकाळी दहाला एका ४० वर्षीय कैलास राणोजी तौर याचा मृतदेह घरातील स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

 The owner's murder, murder case | कामगारानेच केला मालकाचा खून, सांगवीतील घटना

कामगारानेच केला मालकाचा खून, सांगवीतील घटना

Next

पिंपरी : सांगवी येथील समर्थनगर येथे सोमवारी सकाळी दहाला एका ४० वर्षीय कैलास राणोजी तौर याचा मृतदेह घरातील स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
कैलास तौर या फॅब्रिकेशन व्यावसायिकाने त्याच्या वर्क शॉपमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या पत्नीवर अतिप्रसंग केल्याने कामगाराने चिडून जाऊन मारहाण केली. भिंतीवर त्याचे डोके आपटले. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. शिरीष वर्मा (वय ३३, रा. पिंपळे निलख) या आरोपीला खूनप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॅब्रिकेशन व्यवसाय असलेल्या तौर याने पत्नी, मुले यांना गावी सोडले. मूळ गाव गेवराई, जिल्हा बीड येथे पत्नी व मुलांना सोडून आल्यानंतर तौर सांगवी समर्थनगर येथील घरी एकटेच होते. त्यांनी रविवारी रात्री त्यांच्याबरोबर काम करणारा कामगार शिरीष वर्मा याला कुटुंबासह जेवणासाठी घरी बोलावले. रात्री तौर यांच्या घरी पार्टी झाली. मद्यप्राशन, जेवण केल्यानंतर सर्वांनी तौर यांच्याच घरी झोपण्याचे ठरविले. वर्मा पत्नीसह तौर यांच्या घरी मुक्कामी थांबले. रात्री तौर यांनी वर्मा यांच्या पत्नीवर अतिप्रसंग केला. पत्नीचा आरडाओरडा ऐकू आल्याने वर्मा यांना जाग आली. रागाच्या भरात वर्मा याने तौर यांना मारहाण केली. तसेच त्यांचे डोके भिंतीवर आदळले. जबरी मार लागल्याने तौर तेथेच कोसळले. तौर यास रक्ताच्या थारोळ्यात आहे तसेच ठेवून वर्मा पत्नीला घेऊन रात्रीच तौर याच्या घरातून बाहेर पडले.
सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ननावरे, अलका सगर, फौजदार मधुमती शिंदे, शिरीष राऊत, शंकर जाधव, सुरेश खांडेकर, रोहिदास बोहले, नितीन दांगडे,
कैलास केंगळे, दीपक भिसे यांच्या पथकाने आरोपीला २४ तासांच्या आत जेरबंद केले.

- सकाळी नेहमीप्रमाणे वर्कशॉपवर एक कामगार आला. वर्क शॉप खुले नसल्याने तो मालक तौर राहत असलेल्या ठिकाणी त्यांच्या घरी गेला. त्या वेळी ही बाब त्याच्या निदर्शनास आली. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी वर्मा, तसेच त्याच्या पत्नीकडे सखोल चौकशी केली, त्या वेळी वर्मा याने खुनाची
कबुली दिली.

Web Title:  The owner's murder, murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.