‘गाजर' हातात घेत शास्तीकर माफीसाठी महापालिका प्रवेशद्वारासमोर विरोधकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 04:51 PM2019-02-11T16:51:08+5:302019-02-11T16:51:49+5:30

अनधिकृत बांधकामे नियमितीकरण व शास्तीकर माफीबाबत दिलेला शब्द पाळला नाही.

Oppositions movement in front of the municipality entrance | ‘गाजर' हातात घेत शास्तीकर माफीसाठी महापालिका प्रवेशद्वारासमोर विरोधकांचे आंदोलन

‘गाजर' हातात घेत शास्तीकर माफीसाठी महापालिका प्रवेशद्वारासमोर विरोधकांचे आंदोलन

Next
ठळक मुद्देसंपूर्ण शास्तीकर माफी,  अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोड असे अनेक प्रश्न प्रलंबित

पिंपरी-चिंचवड : शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफ करावा, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेडझोन, रिंग रोडबाबतच्या प्रश्नांकडे सत्ताधारी भाजपा व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी,  दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी विरोधी पक्ष, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आज  (सोमवारी) महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. 'गाजर' हातात घेऊन सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. 
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख योगेश बाबर, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे,  मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, शेकापचे हरीष मोरे, स्वराज इंडिया अभियानाचे मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेविका वैशाली घोडेकर, माजी नगरसेविका मंदा आल्हाट, छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, रोमी संधू, राजू सावळे तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी हातात गाजरे घेऊन सहभागी झाले आहेत. 

.........................

महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण, एमआयडीसी व म्हाडा क्षेत्रातील वषार्नुवर्षे भिजत पडलेल्या संपूर्ण शास्तीकर माफी,  अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोड असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू या..! दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केली नाही. 

अनधिकृत बांधकामे नियमितीकरण व शास्तीकर माफीबाबत दिलेला शब्द पाळला नाही. 9 जानेवारीला चिंचवडमधील जाहीर कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. ही मुदत 24 जानेवारीलाच संपली आहे. मात्र, प्रश्व सुटला नाही. त्यामुळे ही घोषणाही 'गाजर'च निघाले. या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे, आंदोलकांनी सांगितले आहे.

Web Title: Oppositions movement in front of the municipality entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.