‘बीआरटी’चा मार्ग खुला, पीएमपीएमएल बसचा अडथळा झाला दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:09 AM2018-06-12T03:09:06+5:302018-06-12T03:09:06+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या रावेत ते औंध बीआरटी या मार्गावर डांगे चौकात वाकड फाटा येथे उड्डाणपुलाखाली बीआरटीएस मार्गावर रिक्षाचालकांनी रिक्षा थांबा तयार केल्याने येथे दिवसभर रिक्षा उभ्या केल्या जात होत्या.

Open the path of 'BRT' | ‘बीआरटी’चा मार्ग खुला, पीएमपीएमएल बसचा अडथळा झाला दूर

‘बीआरटी’चा मार्ग खुला, पीएमपीएमएल बसचा अडथळा झाला दूर

Next

थेरगाव - पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या रावेत ते औंध बीआरटी या मार्गावर डांगे चौकात वाकड फाटा येथे उड्डाणपुलाखाली बीआरटीएस मार्गावर रिक्षाचालकांनी रिक्षा थांबा तयार केल्याने येथे दिवसभर रिक्षा उभ्या केल्या जात होत्या. त्यामुळे वाहतुकीला व पीएमपी बसला अडथळा निर्माण होऊन वाहतूक खोळंबण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.
याबाबत दि. ७ जून रोजी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत येथे थांबणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे बीआरटीएस मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्र सरकारच्या ‘जेएनएनयूआरएम’ योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम अर्थात ‘बीआरटीएस’चे जाळे निर्माण केले. त्यासाठी किवळेतील मुकाई चौक ते औंध दरम्यान बीआरटीएस मार्ग सुरू करण्यात आला आहे; पण रिक्षाचालकांनी डांगे चौकात वाकड फाट्यावर या मार्गात अनधिकृत रिक्षा थांबा तयार केला होता. येथे थांबलेल्या रिक्षांचा पीएमपी बसला अडथळा होत होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे येथे रिक्षा थांबविण्याचे प्रकार बंद झाले आहेत.

डांगे चौकात वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. नागरिकांच्या सोई सुविधेसाठी आणि वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशाने पीएमपी बससाठी बीआरटीएस मार्ग उभारण्यात आला आहे. डांगे चौकासह शहरात अनेक ठिकाणी बीआरटीएसच्या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी रिक्षाचालकांनी रिक्षा थांबा तयार केलेले आहेत. परिणामी, वाहतुकीला आणि पीएमपी बसला अडथळा निर्माण होत आहे.

Web Title: Open the path of 'BRT'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.