One killed, one inmate, one absconding | मारहाण प्रकरणातील जखमीचा मृत्यू, दोघे अटकेत, एक फरार

किवळे  - विकासनगर-किवळे येथील टी सी कॉलनी येथे एका २३ वर्षीय तरुणाला जुन्या भांडणाच्या कारणावरून रविवारी (दि. ३१) दुपारी बाराच्या सुमारास तिघांनी अडवून लोखंडी रॉड, दगडाने मारहाण केली होती. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना शनिवारपर्यंत (दि. ६) पोलीस कोठडी सुनावली.
वीरन ऊर्फ गुड्डू मलंग मुत्तू (वय २२, रा. टी. सी. कॉलनी, विकासनगर, किवळे ) व संदीप ऊर्फ संद्या शंकर विटकर (वय ३०, रा. आदर्शनगर, शिंदे नर्सरीजवळ, किवळे) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांच्या फरारी साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. मोनू विजय टाक (वय २३, रा. फ्लॅट नं. ए २/७, सौदागर गार्डन, विकासनगर, किवळे) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विजय टाक यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकासनगर येथील सौदागर गार्डनच्या मागील बाजूच्या टी सी कॉलनी येथून मोनू टाक रविवारी दुपारी बाराच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी त्याला अडविले. वीरन याने ‘तुला खूप माज आला आहे. तुला आता जिवंत सोडत नाही’ असे म्हणून मोनूच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला.
संद्या व त्यासोबत असणाºया साथीदाराने मोठ्या दगडाने छातीत व पोटावर मारून त्यास गंभीर जखमी केले. जखमी मोनूवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार व त्यांच्या कर्मचाºयांनी सोमवारी रात्री सापळा रचून वीरन व संदीप या दोघांना अटक केली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.