पिंपरीत कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:56 PM2018-07-12T13:56:01+5:302018-07-12T13:58:12+5:30

अपघातानंतर कंटेनरचालक पोलीस स्टेशनला स्वत:होऊन हजर झाला असून अद्याप दुचाकीस्वाराची ओळख पटलेली नाही.

one death in container and two-wheeler accident at pimpri | पिंपरीत कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले

पिंपरीत कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले

googlenewsNext
ठळक मुद्देभूमकर चौकातील घटना, दुचाकीस्वाराची ओळख पटलेली नाही.

पिंपरी : आयटी पार्क हिंजवडीकडून डांगे चौकाच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीस्वाराला मालवाहतुक करणाऱ्या कंटेनरने चिरडले. हा अपघात गुरुवारी ( दि. १२जुलै) दुपारी एकच्या सुमारास मुंबई बंगळूर महामार्गावरील भुमकरवस्ती भुयारी मार्गात झाला. मयत दुचाकीस्वार हे शनी मंदिराकडून येत डांगे चौकाच्या दिशेने जात होता. कंटेनर (एमएच ०६, एक्यू ५९४४) हिंजवडीहुन डांगे चौकाच्या दिशेने जात होता. हे दोनही वाहने भुयारी मार्गात एकत्र आले. तेवढ्यात कंटेनरच्या मागील चाकाखाली दुचाकीस्वार चिरडला गेला. या घटनेनंतर कंटेनरचालक पोलीस स्टेशनला स्वत:होऊन हजर झाला असून अद्याप दुचाकीस्वाराची ओळख पटलेली नाही. हिंजवडी पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.  

Web Title: one death in container and two-wheeler accident at pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.