मावळ तालुक्यात गर्भलिंग चाचणीबाबत " ना दाद ना फिर्याद "

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 01:39 PM2019-05-15T13:39:56+5:302019-05-15T13:49:50+5:30

मावळ तालुक्यामध्ये काही सोनोग्राफी सेंटरवर गर्भलिंग चाचणी सुरू आहे. त्यासाठी सुमारे पस्तीस हजार रुपये शुल्क आकारले जात असल्याचे समजते, अशी चर्चा आहे.

'' no response and no complaint '' about the pregnancy test in Maval taluka | मावळ तालुक्यात गर्भलिंग चाचणीबाबत " ना दाद ना फिर्याद "

मावळ तालुक्यात गर्भलिंग चाचणीबाबत " ना दाद ना फिर्याद "

googlenewsNext
ठळक मुद्देवैद्यकीय विभागाकडून सोनोग्राफी सेंटरकडे दुर्लक्षतालुक्यात ३९ सोनोग्राफी सेंटर आहेत. त्यातील पाच बंद

विजय सुराणा-  
वडगाव मावळ : मावळ तालुक्यामध्ये काही सोनोग्राफी सेंटरवर गर्भलिंग चाचणी सुरू आहे,  अशी चर्चा आहे. त्यासाठी सुमारे पस्तीस हजार रुपये शुल्क आकारले जात असल्याचे समजते. परंतु याप्रकरणी भरारी पथकाकडून चौकशी होत नाही किंवा याप्रकरणी कोणी तक्रारही देत नाही, त्यामुळे या प्रकरणाची अवस्था ना-दाद ना फिर्याद अशी झाली आहे. 
मावळ तालुक्यामध्ये मुलीचा जन्मदर २०११ ते १२ या वर्षात हजारी ८५१ होता. त्यानंतर २०१४ -१५ मध्ये ९२५ झाले होते. यासाठी जनजागृती करण्यात आली होती. आता हे प्रमाण पुन्हा ९०२ वर आले आहे.  मुलीचा जन्मदर पुन्हा घटत आहे.  यामागची कारणे शोधावीत, अशी मागणी होत आहे. 
तालुका आरोग्य अधिकारी  डॉ. चंद्रकांत लोहारे  म्हणाले, ‘‘सोनोग्राफीचा दुरुपयोग  झाल्याने सन २०११ ते १२ या वर्षात  हजारी  
८५१ इतका मुलींचा जन्मदर घटला होता. त्यानंतर जनजागृतीमुळे  व कारवाई केल्याने सोनोग्राफीचा  दुरुपयोग  होण्याच्या प्रमाणात  काहीशी  घट झाली. परंतु  अद्यापही काही ठिकाणी हा प्रकार सुरू आहे असे समजते.’’
डॉ. जी. जी. जाधव भरारी पथक म्हणाले, ‘‘तालुक्यात ३९ सोनोग्राफी सेंटर आहेत. त्यातील पाच बंद आहेत. एकाचा न्यायालयात दावा सुरू आहे. या महिन्यात आम्ही सर्वत्र तपासणी केली आहे. शासनाने २५ हजार रुपयांचे  बक्षीस ठेवले आहे.’’
..............
 सध्यातरी अशी चर्चा कानावर आली नाही. तालुक्यातील  मुले व मुलींची संख्या किती आहे हे पाहावे लागेल. परंतु जर कोणी डॉक्टर  सोनोग्राफी  सेंटरमधून अशी बेकायदेशीर तपासणी करत असेल तर आमची संघटना त्याला कधीही पाठीशी घालणार नाही. - डॉ.  दिलीप भोगे, अध्यक्ष, मावळ तालुका डॉक्टर असोसिएशन.

......


वर्षे                      मुले            मुली        एकूण      दरहजारी सरासरी 
                                                                            मुलींचे प्रमाण 
२०११-१२            २०१९          १७२७       ३७५६           ८५१
२०१२- १३           २११०          १९१०     ४०२०            ९०५  
२०१३- १४           १८७३          १७२२    ३५९५              ९११ 
२०१४- १५           १४२८        १३२०      २७४७              ९२४ 
२०१५- १६          १८४७         १५८०       ३४२७              ८५५ 
२०१६- १७           १३७९       १२३८       २६१७              ८९७
२०१७- १८          १५८९        १४३६       ३०२५                ९०३
२०१८- १९          १४३६        १२९६     २७३२               ९०२

Web Title: '' no response and no complaint '' about the pregnancy test in Maval taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.