महापालिका : भाजपा-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकमत; ५०० कोटींच्या उपसूचनांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 07:04 AM2017-10-30T07:04:38+5:302017-10-30T07:04:42+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली असली, तरी त्यामध्ये काँग्रेस आणि राष्टÑवादीतील सदस्यांची संख्या अधिक आहे.

NMC: BJP-NCP leaders unanimously; Rainfall of subdivision of 500 crores | महापालिका : भाजपा-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकमत; ५०० कोटींच्या उपसूचनांचा पाऊस

महापालिका : भाजपा-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकमत; ५०० कोटींच्या उपसूचनांचा पाऊस

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली असली, तरी त्यामध्ये काँग्रेस आणि राष्टÑवादीतील सदस्यांची संख्या अधिक आहे. पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणाºया भाजपानेही विरोधकांशी सलगी करण्यास सुरुवात केली आहे. उपसूचनांवरून सत्ताधारी आणि विरोधकांत खटके उडत असताना गेल्या सभेत जादू झाली आहे. सूचनांचा पाऊस पडला आहे. सुमारे ५०० कोटींच्या उपसूचना मंजूर केल्या आहेत.
महापालिकेत भाजपाची सत्ता आली असली, तरी कारभारी जुनेच आहेत. पहिल्यांदाच सत्ता आल्याने सुरुवातीला सभागृह चालविण्यात धांदल उडाली होती. सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. गेल्या महासभेत उपसूचनांना राष्टÑवादीच्या विरोधकांनी फारसा ठोस असा विरोध केला नाही.
राष्ट्रवादीच्या कार्यकाळात एखादा प्रकल्प सुरू केल्यानंतर त्या कामाचा खर्च काही कारणास्तव वाढला, असे सांगून वाढीव खर्चाचे प्रस्ताव मंजूर केले जात असत, मूळ कामाच्या प्रस्तावात अतिरिक्त कामाचे प्रस्ताव जोडले जात आणि त्यासाठी पुन्हा निधीची तरतूद केली जात. हीच परंपरा भाजपाने कायम ठेवली आहे. महापालिका सभेत वाढीव - सुधारित खर्चाच्या सुमारे ४५० कोटी रुपयांच्या प्रशासकीय कामांच्या उपसूचना मंजूर केल्या आहेत. त्यात भाजपा पदाधिकारी आणि राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांच्या प्रभागातील विकासकामांचा समावेश आहे. महापालिकेचा सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा मूळ ३०४८ कोटी, तर जेएनएनयूआरएमसह ४८०५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सर्वसंमत
आहे. सार्वत्रिक निवडणुकीमुळे
यंदा अर्थसंकल्पाला विलंब झाला. त्यातच सत्तांतर झाल्याने भाजपाने उपसूचनांचा पाऊस पाडत अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये
फेरफार केले.
पिंपळे गुरव येथे रस्ता विकसित करणे, पुतळा उभारणे, प्रभागांमध्ये रस्त्यांचे डांबरीकरण करणे, शाहू उद्यान - बर्ड व्हॅली उद्यान आणि शिव - शाहू - शंभो उद्यानाचे नूतनीकरण, पिंपळे सौदागरमध्ये रस्त्याचा विकास करणे,नाल्याला भिंत बांधणे, ग प्रभागात रस्त्याचे चर बुजविणे, ड प्रभागातील रस्त्यांचे चर बुजविणे, पिंपळे निलखमध्ये रस्ता, प्रभागात नाल्यांची कामे, बीआरटी रस्त्यामधील नाला बंदिस्त करणे, काळेवाडी फाटा ते कस्पटे वस्ती दरम्यान ग्रेड सेपरेटर बांधणे अशा १२७ कोटी ५० लाखांच्या नवीन कामांचा समावेश अर्थसंकल्पात केला आहे. तर, कृष्णानगरातील स्पाईन रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याऐवजी पादचारी भुयारी मार्ग उभारणे अशा सुधारणा कामासही उपसूचनेद्वारे मान्यता दिली आहे. या कामासाठी पूर्वी ४५ लाखांची
तरतूद आता चार कोटी ४५ लाख रुपये केली आहे. कृष्णानगरातील जागांचे सपाटीकरण, सीमाभिंतीसाठी सहा कोटी रुपयांची सुधारित तरतूद केली आहे.

Web Title: NMC: BJP-NCP leaders unanimously; Rainfall of subdivision of 500 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.