थकबाकीसह मिळकतकर भरल्यास नव्वद टक्के दंड माफ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 09:17 PM2018-09-25T21:17:36+5:302018-09-25T21:22:15+5:30

आॅक्टोबर महिन्यात थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर जमा करणाऱ्या मिळकतधारकांना ७५ ते ९० टक्के दंड माफ केला जाणार आहे,

Ninety per cent penalties on income tax will be cancelled | थकबाकीसह मिळकतकर भरल्यास नव्वद टक्के दंड माफ

थकबाकीसह मिळकतकर भरल्यास नव्वद टक्के दंड माफ

Next
ठळक मुद्देसहामाही व नऊमाहीनंतर प्रत्येक महिन्यास बिलावर दोन टक्के दराने दंड थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना दंडात ७५ टक्के सवलत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आगाऊ मिळकतकर भरून घेतला जातो. थकबाकीदावर सहामाही व नऊमाहीनंतर प्रत्येक महिन्यास बिलावर दोन टक्के दराने दंड आकारला जातो. दंडावर सवलतीची अभय योजना राबविली आहे. आॅक्टोबर महिन्यात थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर जमा करणाऱ्या मिळकतधारकांना ७५ ते ९० टक्के दंड माफ केला जाणार आहे, संदर्भातील प्रस्तावास स्थायी समितीने मंजूरी दिली. 
महापालिकेच्या वतीने मिळकतकराची वसूली केली जाते. महापालिका क्षेत्रात सोळा विभागीय कर संकलन कार्यालये आहेत. तिथे मिळकतकर जमा केला जातो. सन २०१०-२०११पासून थकीत मिळकतकरावर आॅक्टोबर आणि जानेवारीनंतर प्रत्येक महिन्यास बिलावर दोन टक्के दराने दंड आकारला जातो. वषार्नुवर्षे मालमत्ता बंद असल्याने, मालक व भाडेकरू तसेच, कौटुंबिक वादामुळे, न्यायालयीन प्रकरण, रस्ता रूंदीकरणामध्ये पूर्ण किंवा काही प्रमाणात पाडलेली मालमत्ता आणि आर्थिक परिस्थिती आदी कारणांमुळे मिळकतकर भरला जात नाही. परिणामी कराची  थकबाकी वाढत  आहे. थकीत मिळकतकर वसुल व्हावा म्हणून पालिकेने या दोन टक्के दंडाच्या रक्कमेत सवलत देण्याची योजना जाहीर केली आहे. थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर १ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत भरणाºया नागरिकांना दंडामध्ये ९० टक्के सूट दिली जाणार आहे. तर, ३१ आॅक्टोबर या कालावधीत थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना दंडात ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे, यासंदभार्तील विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली आहे.
अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, ह्यह्यमहापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या सवलत योजनेचा लाभ घेऊन थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरावा,  या अभय योजनेच्या प्रसिद्धीसाठी कर संकलन विभागातर्फे जनजागृती मोहिम होती घेण्यात येणार आहे.

Web Title: Ninety per cent penalties on income tax will be cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :PuneTaxपुणेकर