Nine crore rupees corruption, Shivsena MP's allegations, Nigdi rings, BJP politicians looted | नव्वद कोटींचा भ्रष्टाचार, शिवसेना खासदारांचा आरोप, निविदेतील रिंगमधून भाजपा नेत्यांकडून पालिकेची लूट

पिंपरी : ‘ना भय, ना भ्रष्टाचार ’असे आश्वासन देऊन महापालिकेत सत्ता मिळविली, तेच भाजपा नेते भ्रष्टाचार करून महापालिकेची लूट करू लागले आहेत, असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंग बारणे यांनी केला. ३२५ कोटींच्या कामात ठेकेदारांची रिंग करून ९० कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, याप्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुणे महापालिकेच्या निविदाप्रक्रियेत असाच भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निविदा रद्द करण्यास सांगितले. असाच निर्णय मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडमधील भाजपा नेत्यांनी केलेल्या निविदा रिंग प्रकरणात घेतील, अशी अपेक्षा आहे. सात डिसेंबरला १२ ठरावीक ठेकेदारांना रिंग करून ४२५ कोटींचे काम दिले आहे. महापालिकेत यापूर्वीही हेच ठेकेदार १५ ते २५ टक्के कमी दराने काम करत होते. तेच ठेकेदार या वेळी ८ ते ९ टक्के जादा दराने निविदा भरून काम करायला पुढे आले आहेत. २५ टक्क्यांचा फरक व गफला सरळ दिसून येत आहे, असा आरोप आढळराव पाटील यांनी केला.
ते म्हणाले, देशातील भ्रष्टाचाराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाºयांच्या भ्रष्टाचाराचा वेग अधिक आहे. ठेकेदारांनी रिंग करून महापालिकेचे कोट्यवधीचे नुकसान केले आहे. त्यातून भाजपाचे पदाधिकारी, महापालिका आयुक्त आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने महापालिकेला लुटण्याचे काम सुरू आहे. एका वर्षात २५० कोटींना चुना लावला, आणखी चार वर्षात किती भ्रष्टाचार होणार आहे.
पुणे, मुंबई, सोलापूर या महापालिकांपेक्षा मोठ्या प्रमाणावर पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचार आहे. महापालिकेतील रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया थांबवून दोषींवर कारवाई करावी. मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहे. त्यांनी दखल न घेतल्यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करणार आहे. या आगोदर भोसरी शीतलबाग पुलाच्या भ्रष्टाचाराबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे.

भ्रष्टाचार अन् दहशत सुरू
महापालिकेत राष्टÑवादी काँग्रेसच्या सत्ता काळात विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची आरोळी उठविणारेच भाजपाचे पदाधिकारीच भ्रष्टाचार करू लागले आहेत. या भ्रष्टाचारास प्रशासनसुद्धा तेवढेच जबाबदार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधाºयांकडून लूट होत आहे. सत्तेत बसलेलेच भ्रष्टाचार करीत आहेत. सत्ताधाºयांनी शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करून लूट चालवली आहे, असा आरोप खासदार बारणे यांनी केला.

 


Web Title: Nine crore rupees corruption, Shivsena MP's allegations, Nigdi rings, BJP politicians looted
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.