राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी, नगराध्यक्षपदी मयूर ढोरे, भाजपाला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 01:59 AM2018-07-21T01:59:26+5:302018-07-21T01:59:29+5:30

वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारत मावळात सत्तेत असलेल्या भाजपाला धक्का दिला.

NCP's stance, Mayur Dhore as city president, PM push | राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी, नगराध्यक्षपदी मयूर ढोरे, भाजपाला धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी, नगराध्यक्षपदी मयूर ढोरे, भाजपाला धक्का

Next

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारत मावळात सत्तेत असलेल्या भाजपाला धक्का दिला. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीचे उमेदवार मयूर ढोरे विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत फाटाफूट होऊनही भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले. मावळातील पंचायत समितीसह लोणावळा, तळेगाव, देहूरोड ही शहरे भाजपाच्या ताब्यात असताना वडगाव हे मुख्यालयाचे ठिकाण ताब्यातून गेल्याने हा भाजपाचा बालेकिल्ल्यात मोठा पराभव मानला जात आहे.
तिकीट वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. एका गटाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे सदस्य बाबूराव वायकर, बाळासाहेब ढोरे, मंगेश ढोरे हे करीत होते. त्यांनी वडगाव-कातवी नगरविकास समिती स्थापना केली होती, तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व गणेश ढोरे, चंद्रकांत ढोरे व इतर करीत होते. त्यांनी श्री पोटोबामहाराज समितीची स्थापना केली होती. या निवडणुकीत भास्करराव (अप्पा), गणेश (अप्पा) व बाबूराव (अप्पा) या तिन्ही अप्पांनी ताकत पणाला लावली होती. अखेर बाबूरावअप्पांनी बाजी मारली.
एकहाती सत्ता नसल्याने अडचणी
वडगाव नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी सत्ता एकहाती कोणत्याच पक्षाकडे दिली नाही. भाजपा ७, राष्ट्रवादी काँग्रेस ७, अपक्ष २, तर मनसेचा एक उमेदवार विजयी झाला. या निकालाने उपनराध्यक्ष पदासह इतर पदांचे वाटप करण्यासाठी एकमेकांचा आधार घ्यावा लागणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे सात उमेदवार विजयी झाले, तरी ती दोन गटांची बेरीज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र असते, तर भाजपा नगसेवकांची संख्या कमी झाली असती. आगामी निवडणुकीत भाजपाला विचार करण्याची वेळ या निकालाने आणली आहे.
वडगाव नगरपंचायत निकाल
भारतीय जनता पक्ष : ७
राष्ट्रवादी आघाडी : ७
अपक्ष (राष्ट्रवादी) : २
मनसे : १
एकूण : १७

Web Title: NCP's stance, Mayur Dhore as city president, PM push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.