अंगावर दुचाकी घालत, डोक्यात दगडाने वार करून तळेगाव दाभाडेत युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:48 PM2018-02-24T12:48:03+5:302018-02-24T12:48:03+5:30

स्कुटरवरून जाणाऱ्या दोघांचा पाठलाग करून युवकाचा खून केल्याचा प्रकार शनिवारी पहाटे एकच्या सुमारास घडला. आंबी गावच्या हद्दीत वडगाव रस्त्यावर आरएमसी प्लॅन्टच्याजवळ घडलेल्या या कथित घटनेत विनोद सुरेश गायकवाड (रा. कामशेत) यांचा मृत्यू झाला आहे.

murder in Talegaon Dabhade by dashing a bicycle on the body | अंगावर दुचाकी घालत, डोक्यात दगडाने वार करून तळेगाव दाभाडेत युवकाचा खून

अंगावर दुचाकी घालत, डोक्यात दगडाने वार करून तळेगाव दाभाडेत युवकाचा खून

googlenewsNext
ठळक मुद्देअरविंद गौतम निकाळजे यांनी दिली फिर्याद, तिघेही आरोपी फरारकलम ३०२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे : स्कुटरवरून जाणाऱ्या दोघांचा पाठलाग करून युवकाचा खून केल्याचा प्रकार शनिवारी पहाटे एकच्या सुमारास घडला. आंबी गावच्या हद्दीत वडगाव रस्त्यावर आरएमसी प्लॅन्टच्याजवळ घडलेल्या या कथित घटनेत विनोद सुरेश गायकवाड (रा. कामशेत) यांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात अरविंद गौतम निकाळजे यांनी फिर्याद दिली आहे. तिघेही आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. 
याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद गायकवाड व अरविंद निकाळजे हे स्कुटरवरून रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास आंबीकडून वडगाव मावळ-कामशेतच्या दिशेकडे जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून पाठीमागून येणाऱ्या शशिकांत भरत शिंदे (रा. तळेगाव दाभाडे) आणि त्याच्या दोघा साथीदारांनी स्कूटरला धडक देऊन विनोद व अरविंद यांना खाली पाडले. आरोपिंनी विनोदच्या अंगावर चार ते पाच वेळा मोटारसायकल घातली. नंतर गंभीरजखमी अवस्थेत पडलेल्या विनोदच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने विनोद गायकवाड यांचा मृत्यू झाला.
पोलिसांना या घटनेची खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानंतर सकाळी सातच्या सुमारास आरोपी शशिकांत शिंदे आणि दोघा साथीदारांवर भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील करत आहेत.

Web Title: murder in Talegaon Dabhade by dashing a bicycle on the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.