मुंबई-पुणे महामार्ग : थांबणाऱ्या वाहनांमुळे अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 03:08 AM2018-05-10T03:08:41+5:302018-05-10T03:08:41+5:30

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर थांबणारी अवजड वाहने, अपघातग्रस्त वाहने, तसेच बंद पडलेल्या नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होऊन अनेकांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने तसेच अपघातग्रस्त वाहने वेळेवर बाजूला न केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, अपघातासही कारणीभूत ठरत आहेत.

Mumbai-Pune highway: Barrier with stoppage vehicles | मुंबई-पुणे महामार्ग : थांबणाऱ्या वाहनांमुळे अडथळा

मुंबई-पुणे महामार्ग : थांबणाऱ्या वाहनांमुळे अडथळा

Next

कामशेत : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर थांबणारी अवजड वाहने, अपघातग्रस्त वाहने, तसेच बंद पडलेल्या नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होऊन अनेकांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने तसेच अपघातग्रस्त वाहने वेळेवर बाजूला न केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, अपघातासही कारणीभूत ठरत आहेत.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर तसेच रस्त्याच्या बाजूला मोठी अवजड वाहने रांगेत उभी असतात. महामार्गाशेजारी असणा-या हॉटेल, ढाबा व इतरत्र थांबलेल्या या वाहनांची संख्या अधिक असते. या वाहनांमुळे महामार्गावरून धावणाºया इतर वाहनांसाठी रस्ता अरुंद होतो, रस्त्याचा अंदाज येत नाही. विशेषत: या थांबलेल्या वाहनांमुळे दुचाकीस्वारांसाठी मोठी अडचण निर्माण होत असून, अपघात होत आहेत. याकडे रस्ते महामंडळ व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे महामार्गावर प्रवासादरम्यान आजपर्यंत अनेकांचे निष्कारण बळी गेले आहेत.
महामार्गावर थांबलेल्या वाहनांवर दुसरे एखादे वाहन धडकून एखादा अपघात झाला की ही वाहने बाजूला केली जातात. तसेच नादुरुस्त वाहने भर रस्त्यावर उभी राहत असून येथे कोणत्याही प्रकारच्या सूचना अथवा फलक लावले जात नाहीत. वाहनाच्या मागील बाजूस एखाद्या झाडाची फांदी लटकावून ठेवली जाते. मात्र क्रेन अथवा इतर मार्गाने ते वाहन रस्त्यामधून बाजूला केले जात नाही.
याचप्रमाणे महामार्गाच्या साईड पट्ट्यांवर उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे इतर वाहनचालकांना त्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. यातूनही अनेकदा किरकोळ अपघात घडत असतात. कामशेतमधील पवनानगर फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक सेवारस्त्याने वळविण्यात आली आहे. या सेवारस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी अनेक अवजड व इतर वाहने उभी असतात. अगोदरच अरुंद असलेला सेवारस्ता त्यामुळे आणखी अरुंद होत असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. यातूनच किरकोळ व मोठे अपघात नेहमीच घडत असून या चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात नाही.

Web Title: Mumbai-Pune highway: Barrier with stoppage vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.