गैरवर्तन करणारा पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 01:53 AM2018-10-14T01:53:51+5:302018-10-14T01:54:27+5:30

पिंपरी : पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणाची तक्रार देण्यास गेलेल्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवला. तसेच रात्री दोनच्या सुमारास मोबाइलवर संपर्क साधून ...

misbehavior Police Suspend | गैरवर्तन करणारा पोलीस निलंबित

गैरवर्तन करणारा पोलीस निलंबित

Next

पिंपरी : पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणाची तक्रार देण्यास गेलेल्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवला. तसेच रात्री दोनच्या सुमारास मोबाइलवर संपर्क साधून अश्लील संभाषण केल्याप्रकरणी महिलांनी एकत्रित येऊन तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी तातडीने दखल घेत त्या पोलीस अधिकऱ्यावर निलंबनाची कारवाई केली.


चिखली पोलीस ठाण्यांतर्गतच्या साने चौक पोलीस चौकीतील सहायक पोलीस उपनिरीक्षक रामनाथ पालवे असे निलंबन कारवाई झालेल्या पोलीस अधिकाºयाचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती व पत्नीचे भांडण झाले. त्यामुळे ९ आॅक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास पीडित महिला पोलीस चौकीत तक्रार नोंदविण्यास गेली. तेथे रामनाथ पालवे होते. त्यांनी महिलेचे म्हणणे ऐकून घेत असताना, त्या महिलेशी गैरवर्तन केले. पीडित महिलेच्या खांद्यावर हात ठेवून बोलत असल्याने ही महिला घाबरली. पोलीस अधिकाºयाचे वर्तन ठीक नसल्याने तक्रार नोंदवून ही महिला ११ च्या सुमारास तेथून निघून गेली. तक्रार अर्जावर महिलेने तिचा मोबाइल क्रमांक दिला होता.


रामनाथ पालवे यांनी त्याच रात्री दोनच्या सुमारास महिलेशी मोबाइलवरून संपर्क साधला. तिच्याशी अश्लील संभाषण केले. तसेच आता सर्व काही ठीक आहे ना? अशी विचारपूस केली. घडल्या प्रकाराने महिलेची मनस्थिती बिघडली.


या महिलेने शहर काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा गिरिजा कुदळे यांची भेट घेतली. त्यांना घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. गिरिजा कुदळे यांनी पीडित महिलेसह अन्य महिलांना घेऊन पोलीस ठाण्यात गेल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांची भेट घेतली. महिलांनी केलेल्या तक्रारीची प्रत पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनाही देण्यात आली. पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी गंभीर दखल घेऊन पालवे यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली.

Web Title: misbehavior Police Suspend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.