'जो जातीचं नाव काढेन त्याला ठोकून काढेन', गडकरींकडून समानतेचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 10:27 PM2019-02-10T22:27:39+5:302019-02-10T22:28:26+5:30

गडकरी हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले, त्यावेळी पुनरुत्थान समरसता, गुरूकुलमच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जातीबद्दल आपले मत मांडले

The message of equality from Gadkari is that 'whoever drives the name of the caste will hit him' | 'जो जातीचं नाव काढेन त्याला ठोकून काढेन', गडकरींकडून समानतेचा संदेश

'जो जातीचं नाव काढेन त्याला ठोकून काढेन', गडकरींकडून समानतेचा संदेश

Next

पिंपरी चिंचवड - तुमच्याकडे किती जात आहे, याची मला कल्पना नाही. पण, आमच्या पाच जिल्ह्यातून जात हद्दपार झाली आहे. मी सर्वांना सांगूनच ठेवलंय की, जो जातीचं नाव काढेन त्याला ठोकून काढेन, असं म्हणत मी जात-पात मानत नसून आर्थिक, सामाजिक-समतेच्या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.   

गडकरी हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले, त्यावेळी पुनरुत्थान समरसता, गुरूकुलमच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जातीबद्दल आपले मत मांडले. जातियवाद आणि सांप्रदायिक मुक्त, आर्थिक-सामाजिक समता-एकता या आधारावर संपूर्ण समाजाच संघटन झालं पाहिजे. गरीब-श्रीमंत ही दुफळी संपायला हवी. कोणीही छोट्या किंवा मोठ्या जातीचा असता कामा नये, एकात्मता आणि पूर्ण अखंड समाज असायला हवा हीच संकल्पना असल्याचंही गडकरींनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, लोकसभेची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड मधील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांत जुंपली आहे. चिंचवड येथील एका कार्यक्रमात दोन महिन्यापूर्वी मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघ भाजपाला मिळावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले असताना चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदार संघातील ३० नगरसेवक आणि नेते गडकरी यांना भेटले. तसेच मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळाला पाहिजे, असा आग्रह या नेत्यांनी धरला. युती होवो अथवा न होवो, पण हा मतदारसंघ शिवसेनेला मिळता कामा नये, अशी भूमिका येथील भाजापा नेत्यांनी स्पष्ट केली.
 

Web Title: The message of equality from Gadkari is that 'whoever drives the name of the caste will hit him'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.