संत तुकाराम संतपीठासाठी ठेकेदारावर मेहेरबानी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 01:13 AM2018-12-17T01:13:44+5:302018-12-17T01:14:17+5:30

वाढीव दराच्या निविदांना मान्यता : ४० कोटींचा खर्च ४५ कोटींवर; चिखलीत होणार काम सुरू

Meherabani on contractor for Sant Tukaram's patriot | संत तुकाराम संतपीठासाठी ठेकेदारावर मेहेरबानी

संत तुकाराम संतपीठासाठी ठेकेदारावर मेहेरबानी

Next

पिंपरी : महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठ उभारण्यात येत आहे. त्याच्यासाठी महापालिकेने ४० कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरला असताना कंत्राटदारांनी जादा दराच्या निविदा भरल्या आहेत. त्यामुळे ४० कोटींच्या कामाला आता पंचेचाळीस कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे ठेकेदाराचे चांगभले होणार आहे.

वारकरी संप्रदायातील भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा, वारकरी संप्रदायाचे पारंपरिक शिक्षण जनमाणसांना मिळावे, या उद्देशाने हे ‘संतपीठ’ उभारण्यात येत आहे. टाळगाव चिखलीला सांप्रदायिक वारसा असून, शेजारीच श्रीक्षेत्र आळंदी, देहू या तीर्थक्षेत्रांचे सान्निध्यही लाभले आहे. त्यामुळे टाळगाव चिखली येथे राज्यातील पहिले ‘जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठ’ उभारण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता असताना घेण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये उभारण्यात येणाऱ्या या संतपीठ उभारणीला १३ मे २०१५ रोजी महापालिका सभेत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित चिखली येथील १ हेक्टर ८० गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. या संतपीठामध्ये निवासी स्वरुपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्च पदवीपर्यंतचे केवळ संतसाहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. येथे वसतिगृह, सभागृह, अभ्यासवर्ग आदींचा समावेश असणार आहे. येथील शाळेमध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश असून, हे संतपीठ मराठी माध्यमातून शिक्षण देणारे असणार आहे. महापालिकेतर्फे उभारण्यात येणारे हे संतपीठ आणि त्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापनासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. संतपीठाच्या इमारत बांधकामासाठी महापालिकेतर्फे ४० कोटी ६१ लाख रुपयांची निविदा मागविण्यात आली.

रिंग झाल्याचा संशय
४बी. के. खोसे यांनी ११.१६ टक्के जादा, व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांनी १४.७० टक्के जादा, तर एस. एस. साठे यांनी १६ टक्के जादा दराने निविदा सादर केल्या. बी. के. खोसे यांनी सादर केलेली वाढीव दराची निविदा स्वीकारण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. त्यानुसार म्हणजेच ४४ कोटी ६१ लाख ७३ हजार ३२३ रुपये अधिक रॉयल्टी चार्जेस ३६ लाख ९२ हजार २६४ आणि मटेरिअल चार्जेस १० लाख ३१ हजार ४७७ रुपये असे एकूण ४५ कोटी ८ लाख ९७ हजार ६४ रुपये इतका खर्च संतपीठ उभारणीसाठी येणार आहे.

Web Title: Meherabani on contractor for Sant Tukaram's patriot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.