कामे खोळंबल्याचे नगरसेवकांचे गा-हाणे,आयुक्तांसोबत राष्ट्रवादीची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 04:43 AM2017-09-26T04:43:18+5:302017-09-26T04:43:33+5:30

महापालिकेत सत्ताबदल झाला. १५ वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेली, निवडणुकीपूर्वी राष्टÑवादीच्या काळात ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन झाले; भाजपा सत्तेवर आल्यानंतर ती कामे रेंगाळली आहेत.

A meeting of the corporators, the meeting of the NCP with the Commissioner, is going on | कामे खोळंबल्याचे नगरसेवकांचे गा-हाणे,आयुक्तांसोबत राष्ट्रवादीची आढावा बैठक

कामे खोळंबल्याचे नगरसेवकांचे गा-हाणे,आयुक्तांसोबत राष्ट्रवादीची आढावा बैठक

पिंपरी : महापालिकेत सत्ताबदल झाला. १५ वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेली, निवडणुकीपूर्वी राष्टÑवादीच्या काळात ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन झाले; भाजपा सत्तेवर आल्यानंतर ती कामे रेंगाळली आहेत. प्रभागातील पूर्वीची कामे अर्धवट आहेत, असे गाºहाणे राष्टÑवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नगरसेवकांनी मांडले होते. त्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा
आढावा घेण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री पवार खंडेनवमीला शुक्रवारी सकाळी नऊला महापालिका मुख्यालयात आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या भेटीस येणार आहेत.
मागील १५ वर्षांच्या काळात सत्ता असताना, राष्टÑवादी काँग्रेसच्या माध्यमातून शहरात विकासकामांचा डोंगर रचला. एवढी विकासकामे केल्यानंतरही राष्टÑवादी काँग्रेसला जनतेचा कौल मिळाला नाही. ही खंत मनात बाळगून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराकडे पाठ फिरवली होती. एखाद दुसºया कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी शहरास भेट दिली होती. मात्र पूर्वीप्रमाणे ते पिंपरी-चिंचवडकडे लक्ष देत नसल्याचे जाणवत आहे.

- महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. निवडणुकीपूर्वी राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता असतानाच्या शेवटच्या टप्प्यात उद्घाटन झालेल्या प्रकल्पांकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. ही बाब प्रकर्षाने निदर्शनास आल्याने नेमकी काय अडचण आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने अजित पवार महापालिका आयुक्त हर्डीकर व अन्य प्रमुख अधिकाºयांशी चर्चा करणार आहेत.

Web Title: A meeting of the corporators, the meeting of the NCP with the Commissioner, is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.