आरोपींच्या ‘मेडिकल’साठी कामशेत पोलिसांना करावी लागतेय वणवण; डॉक्टर मिळणे झाले दुरापास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 05:47 PM2018-01-29T17:47:23+5:302018-01-29T17:51:23+5:30

येथील पोलीस ठाणे हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांमधील आरोपींच्या मेडिकल चेकअपसाठी कामशेत पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागत असून कामशेत शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील डॉक्टर मिळणे दुरापास्त झाले असल्याची तक्रार पोलीसच करू लागले आहेत.

For the 'medical' of the accused, the Kamshet police trudging; hard to getting Doctor | आरोपींच्या ‘मेडिकल’साठी कामशेत पोलिसांना करावी लागतेय वणवण; डॉक्टर मिळणे झाले दुरापास्त

आरोपींच्या ‘मेडिकल’साठी कामशेत पोलिसांना करावी लागतेय वणवण; डॉक्टर मिळणे झाले दुरापास्त

googlenewsNext
ठळक मुद्देकामशेत शहरात शासनाचे अनेक पुरस्कार विजेते प्राथमिक आरोग्य केंद्र मात्र निवासी डॉक्टर नाहीतनिवासी डॉक्टरांची नेमणूक करावी; नागरिकांसह आता पोलिसांकडून मागणी

कामशेत : येथील पोलीस ठाणे हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांमधील आरोपींच्या मेडिकल चेकअपसाठी कामशेत पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागत असून कामशेत शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील डॉक्टर मिळणे दुरापास्त झाले असल्याची तक्रार पोलीसच करू लागले आहेत.
कामशेत शहरात शासनाचे अनेक पुरस्कार विजेते प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रात निवासी डॉक्टर नाहीत. शिवाय जे डॉक्टर कार्यरत आहेत ते दुपारी अकरानंतरच गायब होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांची तर गैरसोय होतेच आहे, शिवाय एखाद्या गुन्ह्यातील आरोपीचे मेडिकल चेक अप करण्यासाठी वा इतर कारणांसाठी कामशेत पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे.
कान्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोपीचे मेडिकल करण्यास नेल्यास तेथील वैद्यकीय अधिकारी कामशेतमध्येच करा असेच सूचवतात. या सर्व प्रकारामुळे बहुतेक नेहमीच तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात आरोपींची मेडिकल करण्याची वेळ कामशेत पोलिसांवर येत आहे. त्यामुळेच आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरकारी रुग्णालय असूनही त्याचा काही ही उपयोग होत नसल्याचे त्यांच्याकडून बोलले जात आहे. कामशेत प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी डॉक्टरांची नेमणूक करावी शिवाय कार्यरत डॉक्टर हे पूर्ण वेळ उपस्थित असावे अशी मागणी नागरिकांसह आता पोलिसांकडूनही होत आहे. या विषयी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता ते रुग्णालयात उपस्थित नव्हते.
सोमवारी दुपारी कामशेत पोलिसांना एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचे मेडिकल करायचे होते. मात्र नेहमी प्रमाणे कामशेत मधील सरकारी वैद्यकिय डॉक्टर उपस्थित नसल्याने वीस ते पंचवीस किलोमीटर लांब असलेल्या तळेगाव येथील सरकारी वैद्यकीय डॉक्टर यांना वैयक्तिक फोन करून विनंती करून ही तपासणी करून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले.

Web Title: For the 'medical' of the accused, the Kamshet police trudging; hard to getting Doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.