मावळमध्ये सव्वा बाविस लाख मतदार ; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 10:21 PM2019-04-18T22:21:34+5:302019-04-18T22:22:34+5:30

मावळ लोकसभा मतदार संघात २२ लाख २७ हजार ७३३ मतदार नोंदणी झाली आहे.

Maval has 12 lakh voters; The last voter list declared | मावळमध्ये सव्वा बाविस लाख मतदार ; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

मावळमध्ये सव्वा बाविस लाख मतदार ; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

Next

पिंपरी : केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. मावळ लोकसभा मतदार संघात २२ लाख २७ हजार ७३३ मतदार नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूषांची संख्या अधिक आहे. महिलांची टक्केवारी कमी आहे. 

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार नोंदणी, पुरवणी यादी अंतिम झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सर्व विधानसभा मतदार संघात मतदार जागृती आणि मतदार प्रबोधनही केले होते. महाविद्यालयांमध्ये जागृती करण्यात आली. त्यामुळे नोंदणी मोठ्याप्रमाणावर झाली होती. तसेच शहरीभागात ऑनलाईन नोंदणीलाही प्राधान्य दिले होते. ग्रामीण भागात आॅनलाईन मतदार  नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.  

मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी, चिंचवड, कर्जत, मावळ, उरण, पनवेल अशा सहा विधानसभा असून मतदारांमध्ये ५ लाख १४ हजार ९०२ सर्वाधिक मतदार हे पवनेल मतदार संघात असून त्यापाठोपाठ चिंचवडमध्ये ४ लाख ७६ हजार,७८०,  पिंपरीत ३ लाख ४१ हजार ७०१, मावळमध्ये ३ लाख ३२ हजार २१५, उरणमध्ये २ लाख ८६ हजार ६५८ तर  कर्जतमध्ये  २ लाख ७५ हजार ४७७ मतदार आहेत. एकुण मतदारांमध्ये पुरष मतदार ११ लाख ६५ हजार ७८८ असून महिला मतदार १० लाख ६१  हजार ३१३ मतदार आहेत. तसेच तृतीयपंथी मतदार ३२ आहेत. तसेच सर्व्हिस वोटर सहाशे आहेत.   

महिला मतदारांची संख्या कमी 
मावळ लोकसभा मतदार संघात पुरूष मतदारांच्या संख्येत महिला मतदारांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. पुरूष मतदार ११,६५,७८८ असून महिला मतदार १०,६१,३१३ आहेत. तृतीय पंथीयांची संख्या चिंचवड विधानसभेत अधिक आहेत. तर सर्हिस वोटरची संख्या चिंचवड, पिंपरी, पनवेल आणि मावळमध्ये अधिक आहेत.
 

Web Title: Maval has 12 lakh voters; The last voter list declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.