लायन्स पॉइंटवर काढला जातोय खुलेआम हुक्क्याचा धूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 04:05 AM2017-12-31T04:05:30+5:302017-12-31T04:05:49+5:30

लोणावळ्यातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या लायन्स पॉइंटवर शनिवारी थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला खुलेआम हुक्क्यांचा धूर निघत असल्याचे चित्र पहायला मिळत होते. सायंकाळच्या सत्रात लायन्स पॉइंटवर सूर्यास्त पाहण्याकरिता तोबा गर्दी झाली होती.

 The lights are removed at the point of the point | लायन्स पॉइंटवर काढला जातोय खुलेआम हुक्क्याचा धूर

लायन्स पॉइंटवर काढला जातोय खुलेआम हुक्क्याचा धूर

Next

लोणावळा : लोणावळ्यातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या लायन्स पॉइंटवर शनिवारी थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला खुलेआम हुक्क्यांचा धूर निघत असल्याचे चित्र पहायला मिळत होते. सायंकाळच्या सत्रात लायन्स पॉइंटवर सूर्यास्त पाहण्याकरिता तोबा गर्दी झाली होती.
पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरात थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्याकरिता मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागताकरिता सज्ज झालेली बहुतांश सर्व हॉटेल, सेनेटोरियम, बंगले, सेकंड होम पर्यटकांनी गजबजली आहेत. भूशी धरणाचा परिसर, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, गिधाड तलाव, खंडाळ्यातील राजमाची गार्डन, ड्यूक्स नोज व सनसेट पॉइंट ही ठिकाणे पर्यटकांनी फुल्ल झाली होती. लायन्स पॉइंट येथे पोलीस प्रशासन तसेच वन विभागाचा कसलाही अंकुश नसल्याने खुलेआम उघड्यावर हुक्का पिणाºयांची जत्राच भरल्याचे पहायला मिळत होते. कौटुंबिक पर्यटकांच्या समोर काही युवक व युवती खुलेआम टेबलवर हुक्का ठेवत धूर काढत होते. स्थानिक व्यावसायिक त्यांना आवश्यक ते साहित्य पुरवत होते. काही उच्चभ्रू पर्यटक मोकळ्या मैदानात दारू पित हुक्क्याचा धूर काढत होते. अनेक जण टवाळखोरी करीत आहेत.

वन विभागाच्या अधिका-यांशी हातमिळवणी
वन विभागाच्या ताब्यात असलेले लायन्स पॉइंट हे ठिकाण लोणावळा शहरापासून १२ किमी अंतरावर असून, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला याठिकाणी हजारो लोक एकत्र आले होते. काही जण गाडीमधील म्युझिक सिस्टीमचा आवाज मोठा करून नाचत होते, तर काही जण दारू पित होते, हुक्का ओढत होते असे विदारक चित्र पहायला मिळाले. येथे मागील काळात पोलिसांनी कारवाया केल्या होत्या. सायंकाळी सातनंतर हा परिसर निर्मणुष्य करण्याचे फलक गेटवर झळकत असले तरी वास्तवात रात्रभर याठिकाणी दारू व हुक्का पार्ट्या सर्रास सुरू असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पोलीस व वन विभागाच्या अधिकाºयांना हाताशी धरूनच काही व्यावसायिक याठिकाणी दारू व हुक्का पुरवत असल्याची शहरात चर्चा आहे.

पार्किंगचा गोरख धंदा आला तेजीत
लायन्स पॉइंट याठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून येणाºया वाहनांकडून पावती देऊन पार्किंगचे पैसे गोळा केले जातात. शनिवारी मात्र लायन्स पॉइंटवर पाहणी केली असता वाहनचालकांना कसलीही पावती न देता सर्रास पैसे गोळा करण्याचा प्रकार सुरू असल्याचे पहायला मिळाले. हा पैसा नेमका कोणाच्या खिशात जाणार हा संशोधनाचा विषय असला तरी विकासाच्या नावाखाली जमा केला जाणारा पैसा लाटण्याचा गोरख धंदा याठिकाणी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title:  The lights are removed at the point of the point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा