पोलिसांना सुविधा मिळण्याऐवजी मिळतेय कवायतींची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 05:14 AM2019-03-25T05:14:56+5:302019-03-25T05:16:02+5:30

कॉल आला की तातडीने घटनास्थळी जावा, वेळेवर न गेल्यास जादा कवायतीची शिक्षा अशी पद्धत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी अवलंबिली आहे. पण रिस्पॉन्स टीमला आवश्यक वाहनांसह इतर सुविधा उपलब्ध होत नाहीत.

 Instead of getting facilities to the police, | पोलिसांना सुविधा मिळण्याऐवजी मिळतेय कवायतींची शिक्षा

पोलिसांना सुविधा मिळण्याऐवजी मिळतेय कवायतींची शिक्षा

Next

- मंगेश पांडे

पिंपरी : कॉल आला की तातडीने घटनास्थळी जावा, वेळेवर न गेल्यास जादा कवायतीची शिक्षा अशी पद्धत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी अवलंबिली आहे. पण रिस्पॉन्स टीमला आवश्यक वाहनांसह इतर सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांना घटनास्थळी जाण्यास उशीर होतोे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ‘सुविधांचा शिमगा; तरीही जादा कवायतीच्या शिक्षेची धुळवड’ अशी स्थिती आहे.
नागरिकांना तातडीने मदत मिळावी, पोलिसांची कुमक तातडीने घटनास्थळी पोहोचावी, यासाठी पोलीस आयुक्तांनी प्रत्येक ठाण्यात विशेष टीम स्थापन केल्या. मात्र, पोलीस पथकाला घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी सरकारी वाहनच उपलब्ध होत नाही. दरम्यान, हे पथक कॉल देऊनही वेळेत पोहोचले नाही, तर आयुक्तांच्या शिक्षेलाही सामोरे जावे लागत असल्याने पोलीस कर्मचारी कात्रीत सापडले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी १५ आॅगस्ट २०१८ पासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाले. शहरात कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आयुक्तांनी विविध उपाययोजना राबविल्या. तातडीच्या मदतीसाठी एखाद्या नागरिकाने नियंत्रण कक्षात फोन केल्यास त्यास मदत मिळावी, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात दिवस-रात्री सहा ते सात ‘रिस्पॉन्स टीम’ स्थापन केल्या. त्यात सात ते आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असून, ठाण्यांतर्गत असलेल्या चौकीनिहाय या टीम काम करतात. तसेच काही टीम पोलीस ठाण्यातही असतात.
कॉलची माहिती मिळाल्यानंतर ही टीम तातडीने घटनास्थळी पोहोचून संबंधित व्यक्तीला मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, कॉल आल्यानंतरही काही टीम घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चिंचवड येथील आयुक्तालयात बोलावून आयुक्तांनी ज्यादा कवायतीची शिक्षा केली.
गेल्या काही दिवसांत दोन ते तीन वेळा याप्रकारची शिक्षा पोलिसांना देण्यात आली. मात्र, कॉल आल्यानंतर वाहन उपलब्ध नसल्याने घटनास्थळी पोहोचण्यास उशीर होत असल्याचे पोलीस कर्मचाºयांचे म्हणणे आहे.

रिस्पॉन्स टीमला मिळेना वाहन
सध्या प्रत्येक ठाण्याला एक अथवा दोनच सरकारी चारचाकी वाहने उपलब्ध आहेत. या दोन वाहनांपैकी एक वाहन वरिष्ठ निरीक्षकांसाठी असते. तर दुसरे वाहन आरोपीला न्यायालयात नेण्यासाठी अथवा इतर कामकाजासाठी असते. दरम्यान, रिस्पॉन्स टीमला एखादा कॉल आल्यास वाहनाच्या उपलब्धतेअभावी घटनास्थळी वेळेत पोहोचणे शक्य होत नाही. अथवा खासगी वाहन घेऊन घटनास्थळी पोहोचावे लागते. दरम्यान, वाहन उपलब्धतेअभावी घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला तरी त्याचा ठपका पोलीस अधिकारी, कर्मचाºयांवरच ठेवला जातो. त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागत आहे.

स्लो रिस्पॉन्स टीमला शिक्षा
नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘रिस्पॉन्स टीम’ची स्थापना केली आहे. मात्र, या टीमकडून काही वेळेस ‘स्लो रिस्पॉन्स’ मिळत असल्याने नागरिकांना वेळेत मदत मिळत नाही. दरम्यान, अशाप्रकारे ‘स्लो रिस्पॉन्स’ देणाºया पोलीस कर्मचाºयांना आठवडाभरात दोन ते तीनवेळा ज्यादा कवायतीची शिक्षा देण्यात आली.

कर्मचाºयांना करावा लागतोय गैरसोयीचा सामना
स्वतंत्र आयुक्तालय सुरू झाल्यानंतर शहरात कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आयुक्तांनी वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या. मात्र, या संकल्पना राबविताना व त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना आवश्यक असणाºया सुविधाही पुरविणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे कर्मचाºयांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Web Title:  Instead of getting facilities to the police,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस