व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदा वास्तव्य; नायजेरियन तरुणाला सांगवी पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:53 PM2017-12-14T17:53:01+5:302017-12-14T17:55:05+5:30

बेकायदा वास्तव्य प्रकरणी परकीय नागरिक कायदा १९४६ च्या कलम १४ नुसार ओचुबा किंग्सली एब्युका (वय ३३, रा. मूळचा नायजेरिया) या आरोपीविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal living even after the expiry of the visa; Nigerian youth arrested by Sangvi police | व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदा वास्तव्य; नायजेरियन तरुणाला सांगवी पोलिसांकडून अटक

व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदा वास्तव्य; नायजेरियन तरुणाला सांगवी पोलिसांकडून अटक

Next
ठळक मुद्देपरकीय नागरिक कायदा १९४६ च्या कलम १४ नुसार गुन्हा दाखल कागदपत्रांची कसून चौकशी, दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाचा पासपोर्ट असल्याचे आले निदर्शनास

पिंपरी : भारतात वास्तव्य करण्यासंबंधी मिळालेल्या व्हिसाची मुदत संपुष्टात आल्यानंतरही नायजेरियन तरुण बेकायदा वास्तव्य करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परकीय नागरिक कायदा १९४६ च्या कलम १४ नुसार ओचुबा किंग्सली एब्युका (वय ३३, रा. मूळचा नायजेरिया) या आरोपीविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओचुबा हा नोवसू मंडे या नावाचा पासपोर्ट (पारपत्र) बाळगून सांगवी येथे राहत होता. नोवसू मंडे हे त्याचेच नाव असल्याचे तो भासवत होता. त्या पासपोर्टच्या आधारे तो नायजेरिया देशात जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पोलिसांनी त्याच्याकडील कागदपत्रांची कसून चौकशी केली. त्या वेळी त्याच्याकडे दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाचा पासपोर्ट असल्याचे निदर्शनास आले. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भरतात राहत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. बी़  शेटे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Illegal living even after the expiry of the visa; Nigerian youth arrested by Sangvi police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.