कोठेही लग्न होऊ देणार नाही ; तरूणीला आरोपीची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 01:36 PM2018-12-23T13:36:25+5:302018-12-23T13:38:47+5:30

तुझे मी कोठेही लग्न होऊ देणार नाही. असे धमकावणाऱ्या तरुणाविरूद्ध तरूणीने संत तुकारामनगर पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली आहे.

i will not get u married ; accused threaten women | कोठेही लग्न होऊ देणार नाही ; तरूणीला आरोपीची धमकी

कोठेही लग्न होऊ देणार नाही ; तरूणीला आरोपीची धमकी

पिंपरी :तुझे मी कोठेही लग्न होऊ देणार नाही. असे धमकावणाऱ्या तरुणाविरूद्ध तरूणीने संत तुकारामनगर पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली आहे. या तरूणाविरूद्ध पोलिसांनी शनिवारी  विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष रामराव लांडे (वय २६, रा. कासारवाडी) असे आरोपीचे नाव आहे. या आरोपीने फिर्यादी तरूणीचा पाठलाग केला. त्याच्या त्रासामुळे तरुणीचे ठरलेले लग्न मोडले. तुझे कोठेही लग्न होऊ देणार नाही. असे म्हणत तो वारंवार पाठलाग करुन तरूणीला त्रास देऊ लागला. एवढ्यावरच न थांबता त्याने वडिलांना मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: i will not get u married ; accused threaten women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.