पत्नीला मेसेज का करताे असे म्हणत पतीकडून मित्रावर वार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 04:05 PM2019-01-22T16:05:09+5:302019-01-22T16:07:49+5:30

मित्राच्या पत्नीच्या फेसबुक अकाउंटवरून मित्राला मेसेज करत बोलावून घेतले, तू माझ्या पत्नीला कशाला मेसेज करतोस असं म्हणून त्याच्यावर चाकूने वार केल्याची घटना वाकड परिसरात घडली आहे.

husband threaten to his friend for messaging her wife | पत्नीला मेसेज का करताे असे म्हणत पतीकडून मित्रावर वार

पत्नीला मेसेज का करताे असे म्हणत पतीकडून मित्रावर वार

Next

पिंपरी : मित्राच्या पत्नीच्या फेसबुक अकाउंटवरून मित्राला मेसेज करत बोलावून घेतले, तू माझ्या पत्नीला कशाला मेसेज करतोस असं म्हणून त्याच्यावर चाकूने वार केल्याची घटना वाकड परिसरात घडली आहे. यात तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी तरुणाने वाकड पोलिसात आरोपीविरोधात फिर्याद दिली असून सुनील राजू जाधव अस १९ वर्षीय तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी गिरजेश दशरथ यादव याला पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर माहिती अशी की,आरोपी गिरजेश दशरथ यादव आणि फिर्यादी सुनील राजू जाधव हे दोघेजण काही वर्षांपूर्वी शेजारी राहण्यास होते. आरोपी हा रिक्षा चालक असून फिर्यादी तरुण हा फूड डिलिव्हरी बॉय आहे. याच दरम्यान यादव यांची पत्नी आणि सुनील जाधव हे एकमेकांशी फोन, फेसबुक चॅटिंगद्वारे संपर्कात राहू लागले होते. त्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेले होते. परंतु,तिथे देखील हा प्रकार सुरूच होता. अखेर मध्यरात्री आरोपी यादव याने पत्नीच्या फेसबुक अकाउंट वरून  जाधव यांच्या फेसबुकवर 'मी तुला ओळखते तू पिंपळे सौदागर मध्ये राहतोस, तू मला सहा महिन्यांपूर्वी भेटला होतास. मी घरी एकटीच आहे,तू बळीराम कॉलेज जवळ ये असा मेसेज यादव याने केला.

मेसेज मिळाल्यानंतर जाधव दिलेल्या पत्त्यावर पोहचला, त्या दोघांमध्ये किरकोळ भांडण झाले याचे पर्यावसन मारामारीत झाले. तू माझ्या पत्नीला कशाला मेसेज करतोस असे बोलून यादव ने जाधवर चाकूने वार केले. यात जाधव हा जखमी झाला असून त्याच्यावर खाजसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान,आरोपी यादव याला वाकड पोलिसांनी जेरबंद केले.

Web Title: husband threaten to his friend for messaging her wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.