Happy Diwali 2017 :  'लोकमत' आयोजित स्वरचैतन्य 'दिवाळी पहाट'ची मैफल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 01:23 PM2017-10-19T13:23:28+5:302017-10-19T13:23:52+5:30

लक्ष्मीपूजनाच्या रम्य सकाळी प्रसिद्ध गायक आनंद भाटे, शौनक अभिषेकी यांची स्वरानुभूती, पंडित विजय घाटे यांचे बहारदार तबलावादन आणि अमर ओक यांच्या समधूर अशी 'अमरबन्सी'चा असा अनोखा संगीतमय दिवाळी फराळाचा आस्वाद पिंपरी-चिंचवडकरांनी मिळाला

Happy Diwali 2017: Voluptuous 'Diwali Dawa' concert organized by 'Lokmat' | Happy Diwali 2017 :  'लोकमत' आयोजित स्वरचैतन्य 'दिवाळी पहाट'ची मैफल 

Happy Diwali 2017 :  'लोकमत' आयोजित स्वरचैतन्य 'दिवाळी पहाट'ची मैफल 

विश्वास मोरे/पिंपरी-चिंचवड - लक्ष्मीपूजनाच्या रम्य सकाळी प्रसिद्ध गायक आनंद भाटे, शौनक अभिषेकी यांची स्वरानुभूती, पंडित विजय घाटे यांचे बहारदार तबलावादन आणि अमर ओक यांच्या समधूर अशी 'अमरबन्सी'चा असा अनोखा संगीतमय दिवाळी फराळाचा आस्वाद पिंपरी-चिंचवडकरांनी मिळाला. अभिजात शास्त्रीय संगीत आणि आधुनिक संगीतातील सत्व असे आधुनिकता आणि पंरपरेचे दर्शन घडले. अपूर्व उत्साहात रसिकांना श्रवणसुखाची, स्वरचैतन्याची अनुभूती मिळाली. चिंचवड तानाजीनगर येथील शिवाजी उदय मंडळाच्या भव्य प्रांगणावर औचित्य होतं. लोकमत आयोजित स्वरचैतन्य दिवाळी पहाट मैफलीचे. 
दीपोत्सवातील तिसरा आणि महत्त्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन. पिंपरी-चिंचवडकरांची दिवाळी पहाट स्वरचैतन्याने उजळून निघाली. प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमचे पूजन करण्यात आले. मोहक फुलांची सजावट, वेधक रंगावली आणि परिसर उजळून टाकणा-या दीपोत्सवात स्वरांचा अनोखा उत्सव, मैफल सुरू झाली. प्रारंभीच पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आणि चिरंजिव शौनक अभिषेकी आणि आनंद भाटे यांच्या आश्वासक गायकीची अनुभूती मिळाली. ‘जोगीया मोरे घर आयो...’ या ललत रागाचे लालित्य शौनक आणि भाटे यांनी अत्यंत ताकदीने पेश केले. स्वरांवरील हुकुमत याचे दर्शन घडविले. त्यानंतर ताल धरायला लावणारी ‘आयी पिया आबील मोरा पिया....’’ ही ठुमरी शौनक यांनी पेश केली. त्यानंतर भाटे यांनी संगीत सौभद्रमधील ‘रात्रीचा समय सरून येत उषकाल हा...’ हे पद पेश केले. स्वरतालाची मैफल बहरून गेली. 

'शब्देविन संवादू'ची अनुभूती देणारी अमरबन्सी
त्यानंतर सूर्यनारायणाच्या दर्शनाबरोबरच अमर ओक यांनी अमरबन्सीची अनुभूती दिली. त्यांनी खमाज, आलाप, धून, द्रुत तीन ताल पेश केला.  शब्देविन संवादूची अनुभूती देणारी अमरबन्सीने दिली. यावेळी बासरी आणि पंडित विजय घाटे यांचा तबला अशी जुगलबंदी अनुभवण्यास मिळाली. अर्तमनास स्पर्श करणे सूर आणि तालवादनाची आर्तता अनुभवण्यास मिळाली. त्यानंतर आनंद भाटे यांनी ‘स्वयंवर झाले सितेचे’मधील ‘रम्य ही स्वर्गाहून लंका...’ हे नाट्यपद सादर केले. त्यानंतर जितेंद्र अभिषेकींच्या अजरामर अशा ‘‘हे सुरानो चंद्र व्हा...’ ही रचना शौनक यांनी अत्यंत ताकदीने सादर केली. अभिषेकी घराणा गायकीचे दर्शन घडविले. 
मध्यंतरात कलावंतांचा सत्कार करण्यात आला. लोकमतचे संपादक विजय बाविस्कर यांनी पाहुण्याचे स्वागत केले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, कार्यक्रमाचे प्रायोजक युवराज ढमाले, स्रेहा रेवाळे, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भाईर, लायन्स क्लबचे उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे आदी उपस्थित होते.  दोन रचनामधील जागा आनंद देशमुख यांच्या निवेदनाने भरून काढली. मिलिंद कुलकर्णी यांनी संवादिनीची साथ केली. 

स्वर, तालाची जुगलबंदी
मध्यतरांनंतर घाटे यांचा तबला,  ओक यांची बासरी, अनय गाडगीळ यांचे सिथेसायझर, अभिजित भदे यांचे ड्रम्स जुंगलबंदी सादर झाली. सुर-तालाची अनोखी अनुभूती मिळाली. परंपरा आणि आधुनिक संगीताचा अनोखा मेळ अनुभवण्यास मिळाला. संगीत मैफलीचा कलासाध्याय गाठला. त्यास रसिकांनी भरभरून दाद दिली. वादनकलेचा आस्वाद घेता येणार आहे. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मैफलीत शेवटी शौनक यांनी ‘संतभार पंढरीत...’, ‘अबीर गुलाल, उधळीत रंग...’, तर भाटे यांनी ‘माझे माहेर पंढरी...’, तर दोघांनी ‘विठ्ठलाच्या पायी थरारली वीट...’या रचनेने उत्तरोत्तर रंगलेल्या मैफलीची सांगता झाली. स्वरतालांची मैफल चिरस्मरणीय ठरली. 
लोकमतचे संपादक विजय बाविस्कर म्हणाले, ‘‘लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक विकासात मानदंड निर्माण केले आहेत. त्यापैकी नाट्यमहोत्सव आणि दिवाळी पहाट हे उपक्रम होत. उद्योगनगरीला सांस्कृतिक रूप देण्यात लोकमतने केले आहे.  दरवर्षी सूरांचा अनोखा फराळ पिंपरी-चिंचवडकरांसाठी घेऊन येऊ. नाते अतुट ठेऊया. संगीत ही संस्कृती आहे, ताल हा संस्कार आहे, लय हे मुल्य आहे, हे सुंदर नाते आपण जपूया.’’

विजय घाटे आणि आनंद भाटे, शौनक अभिषेकी यांनी लोकमतच्या दिवळी पहाट मैफलीचे कौतुक केले. ‘‘दीपोत्सव म्हणजे प्रकाशाचे आगमन आणि अंधकाराचा विनाश. पहाटेच्या सुखद वातावरणात अवतरणाºया दीपावलीचे स्वागत करण्याची परंपरा लोकमतने जपली आहे, असे घाटे म्हणाले. तर भाटे म्हणाले, ‘‘ यंदाही दिवाळीचा सण अविस्मरणीय करणारा आनंद देणारी आणि घेणारी मैफल आहे, असे शौनक आणि भाटे म्हणाले.

दिवाळी पहाट प्रेझेंटेड बाय युवराज ढमाले कॉर्प इन असोसिएशन विथ क्रिस्टा एलीवेटर्सचे आयोजन करण्यात आले आहे. पॉवर्ड बाय शाहू शिक्षण संस्थेचे स्थळ प्रायोजक शिवाजी उदय मित्रमंडळ मैदान, आउटडोअर पार्टनर धीरेंद्र आऊटडोअर मीडिया सोल्यूशन्स हे आहेत़ 

आनंद द्विगुणित करणारी मैफल
विजय घाटे आणि आनंद भाटे, शौनक अभिषेकी यांनी लोकमतच्या दिवळी पहाट मैफलीचे कौतुक केले. ‘‘दीपोत्सव म्हणजे प्रकाशाचे आगमन आणि अंधकाराचा विनाश. पहाटेच्या सुखद वातावरणात अवतरणाºया दीपावलीचे स्वागत करण्याची परंपरा लोकमतने जपली आहे, असे घाटे म्हणाले. तर भाटे म्हणाले, ‘‘ यंदाही दिवाळीचा सण अविस्मरणीय करणारा आनंद देणारी आणि घेणारी मैफल आहे, असे शौनक आणि भाटे म्हणाले. तर एकाच व्यासपीठावर घाटे आणि भाटे यांच्या स्वरतालाची अनुभूती लोकमतच्या व्यासपीठावर सादर झाली. लोकमतमुळे सदतीस वर्षांनी हा योग जुळवून आणल्याबद्दल भाटे यांनी लोकमतविषयी कृतज्ञता व्यक्त केली. 

दिवाळी पहाट मैफलीचे प्रेझेंटेड बाय युवराज ढमाले कॉर्प इन असोसिएशन विथ क्रिस्टा एलीवेटर्सचे असून पॉवर्ड बाय शाहू शिक्षण संस्थेचे स्थळ प्रायोजक शिवाजी उदय मित्रमंडळ मैदान, आउटडोअर पार्टनर धीरेंद्र आऊटडोअर मीडिया सोल्यूशन्स हे होते.

Web Title: Happy Diwali 2017: Voluptuous 'Diwali Dawa' concert organized by 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.