चिंचवडमध्ये गुंडाराज : नंग्या तलवारी नाचवत लूटमार, पोलिसांचे दुर्लक्ष   

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 02:11 PM2019-01-14T14:11:17+5:302019-01-14T14:15:32+5:30

खुलेआम नंग्या तलवारी दाखवत लूटमार केली जात असल्याचे प्रकार चिंचवड मधील दळवीनगर भागात सुरू आहे.गुंडांच्या या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहे

Gundaraj in Chinchwad: gang hamouring travellers at late night with vepoun | चिंचवडमध्ये गुंडाराज : नंग्या तलवारी नाचवत लूटमार, पोलिसांचे दुर्लक्ष   

चिंचवडमध्ये गुंडाराज : नंग्या तलवारी नाचवत लूटमार, पोलिसांचे दुर्लक्ष   

Next

चिंचवड: खुलेआम नंग्या तलवारी दाखवत लूटमार केली जात असल्याचे प्रकार चिंचवड मधील दळवीनगर भागात सुरू आहे.गुंडांच्या या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहे.पोलीसआयुक्तालया पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या परिसरात वाढत्या गुन्हेगारी मुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे.गुंडांच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक संतप्त व्यक्त करीत आहेत.

           दळवीनगरातील रेल्वेगेट परिसरात रात्री च्या वेळी पादचाऱ्यांना अडविले जात आहे.हत्याराचा धाक दाखवून लूटमार केली जाते.नंग्या तलवारी घेऊन हे गुंड परिसरात दहशत निर्माण करीत आहेत.गुंडांच्या या दहशतीला नागरिक घाबरत असल्याने तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.रविवारी रात्री या भागात सहा ते सात गुंडांनी हत्यारांचा धाक दाखवत पादचाऱ्यांना लुटले.कामावरून येणाऱ्या एका कामगारावर वार केले.मात्र पाठीवर असणाऱ्या सॅक वर हे वार पडल्याने हा कामगार थोडक्यात बचावला.आरडा-ओरडा झाल्याने काही नागरिक घराबाहेत आले.पोलीस यंत्रणेला या घटने बाबत माहिती दिली.घटनास्थळावर पोलीस येताच या गुंडांनी रेल्वे रुळाच्या दिशेने पळ काढला.मात्र ती हद्द निगडी पोलिसांची असल्याचे सांगत तुम्ही निगडीत तक्रार करा असे सांगण्यात आले.पोलिसांच्या या कार्यपद्धतीमुळे नागरिक संतप्त झाले.

         खुलेआम हत्यारे घेऊन दहशत करणाऱ्या या गुंडांना धाक नसल्याने दिवसेंदिवस त्यांचे मनोबल वाढत आहे.यातील काही सराईत गुन्हेगार असून ते अल्पवयीन असल्याने त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही.विविध गुन्हे करूनही ते मोकाट फिरत असल्याने त्यांच्या दहशतीला नागरिक घाबरत आहेत.या भागातील विद्युत दिवे बंद करून अथवा फोडून रस्त्यावर अंधार केला जात असल्याचे नागरिक सांगत आहेत.पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

Web Title: Gundaraj in Chinchwad: gang hamouring travellers at late night with vepoun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.